आज नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस! Today is the last day to file nominations!




चंद्रपूर (का.प्र.) : नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा आज बुधवार दि. २७ हा शेवटचा दिवस असून सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहे . 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Click करा व हे सुद्धा वाचा...!

या उमेदवारांनी दाखल केले नामांकन !
13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यात विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया), धानोरकर प्रतिभा सुरेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज (भारतीय जनता पार्टी) आणि अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल केली आहे.

आज निश्चित होईल कशी  राहील लढत !

आज शेवटच्या दिवशी कोणते उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार त्यानंतर लढतीचा अंदाज लागणार आहे,  खरी लढत भाजप- काॉंग्रेस यांच्यातचं होणार असली तरी कोणता उमेदवार कुठे प्रभाव टाकु शकणार व कोणत्या उमेदवाराला त्याची हानी होऊ शकेल, यांचा अंदाज आज शेवटच्या दिवशी च्या नामांकनानंतर निश्चित होऊ शकेल.
निवडणूक सामान्य निरीक्षक
चंद्रपुरात दाखल!
चंद्रपूर : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव हे 26 मार्च रोजी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments