बेशिस्त पोलिसांना शिस्त लावण्याचे नविन पोलिस अधिक्षकांसमोर मोठे आव्हान ! A big challenge in front of the new Superintendent of Police to discipline the unruly police!चंद्रपूर ( वि.प्रति.)
नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या पदभार नवीन पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांनी सांभाळला आहे. रवींद्र परदेशी यांच्या तडकाफडकी (अवघ्या १४) महिन्यात झालेली बदली ही चंद्रपूर जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी व त्यावर अंकुश लावण्यात अपयश असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे व त्यात तथ्यही आहे. 

Link वर क्लिक करा व वाचा.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उबाठा) गटाचे २५ वर्षीय युवा शहर प्रमुख शिवा वझरकर यांची हत्या करण्यात आली. या हत्याचे सूत्रधार राजकीय वरदहस्त प्राप्त स्वप्निल काशीकर याचेसह ७ आरोपींना त्वरित अटक करण्यात आली. रामनगर पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना विशेष वागणूक देण्यात येत असल्याचे आरोपानंतर तडकाफडकी हा तपास एलसीबी (स्थानिक गुन्हा शाखा) यांचेकडे देण्यात आला, त्यानंतर आरोपी स्वप्निल काशीकर याचे कार्यालयातून एअरगन सह घातक शस्त्रे एलसीबी पथकाने जप्त केली व आरोपींचा दोन दिवसांचा मागितलेला पिसीआर त्यातून पुन्हा काय गवसते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. रामनगर पोलिसांनीही यापूर्वी आरोपी काशीकर याचे कार्यालयाची तपासणी केली होती असे सांगण्यात येत आहे परंतु त्यांना त्या ठिकाणी काही प्राप्त झाले नाही यावरून पोलिसांची साठ-गाठ व हत्येनंतर झालेले आरोप यात तथ्य आढळून येते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांचे समोर बेशिस्त पोलिसांना शिस्त लावण्याचे मोठे आव्हान आहे. 
Link वर क्लिक करा व वाचा.

यापूर्वीही चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस शिपायाला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, या गंभीर बाबीकडे पोलिस अधिक्षकांनी लक्ष पुरवून विभागातील बेशिस्तीला आळा घालण्याला प्रथम प्राधान्य द्यायला हवे, असे नागरिकांत बोलले जात आहे. नवीन पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत त्या अपेक्षेत पोलीस अधीक्षक अवश्य यशस्वी होतील, अशी आशा बाळगु या......!स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी मोहीम! Brave campaign of the local crime branch!
चंद्रपूर जिल्ह्यात एलसीबी पथकाची विशेष प्रतिमा आहे. आतापावेतो एलसीबी पथकाने अनेक धाडसी कारवाया व मोहिमा पार पाडल्या आहेत. आज जिल्ह्यात एलसीबी पथकाचे विशेष कार्य आहे. नुकतेच काही महिन्यापूर्वी एलसीबी पथकाची धुरा महेश कोंडावार यांचेकडे सुपुत्र करण्यात आली. नुकतेच प्रजासत्ताक दिनी कोंडावार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कृत ही करण्यात आले. आज त्याच एलसीबी पथकाकडे शिवा वझरकर हत्येचा तपास देण्यात आला आहे. एलसीबी पथकाच्या या हत्याकांडातील आरोपीतांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून आणखीन तपासात बरेच काही समोर येण्याचे बोलले जात आहे. राजकीय संरक्षण प्राप्त रेती, कोळसा तस्करीत लिप्त अपराधी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा कोंडावार यांचे नेतृत्वात व नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अवश्य पुढाकार घेईल अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.
Link वर क्लिक करा व वाचा.

Post a Comment

0 Comments