चंद्रपूरातील व्यापाऱ्यांचा नागपुरमध्ये कोरोना ने मृत्यूचे ते वृत्त खोटे!

जिल्ह्यात अद्याप एक ही रूग्ण नाही, कोरोना संबंधित खोटे वृत्त दिल्यास होणार कारवाई


चंद्रपूर  : चंद्रपूर शहरातील प्रशीद्ध स्क्रैप व्यापारी यांचा कोरोना ने मृत्यु झाल्याच्या झाल्याच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण असल्याचा संदेश सगळीकडे पसरला, ते वृत्त खोटे असून चंद्रपुरात कोरोना चा एक ही रूग्ण नाही. खोट्या बातम्या पसरविल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने पूर्वीच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  चंद्रपूर येथील रुग्णांचा कोरोना बाधित संशयित म्हणून म्रुत्यु झाल्याच्या बातम्या दिल्या त्या केवळ संशयित म्हणून दिल्या मात्र ते रुग्ण चंद्रपूर येथील रहमत नगर घुटकांळा वार्डाचे  रहिवाशी असून प्रशीद्ध स्क्रैप व्यापारी होते,  ते भोला शेठ म्हणून चंद्रपूरमधे ओळखले जायचे. त्यांना काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील नगराळे यांच्या खाजगी रुग्णालयात निम्बोनिया झाल्याने भरती करण्यात आले होते व काही दिवसातच सुट्टी दिल्यानंतर ते दिल्लीला लॉकडाऊनच्या अगोदर काही कामानिमित्त गेले होते व ते परत आल्यावर काही दिवस चांगले होते मात्र नंतर त्यांची प्रकृती एकदम बिघडल्याने शनिवारी त्यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र पाच दिवस होऊन सुद्धा त्यांची प्रकृती सुधारली नसल्याने व त्यांना खोकला असल्यामुळे अखेर त्यांना नागपूरच्या मेओ रुग्णालयात वार्ड क्रमांक ४ मधे शासकीय नियमाप्रमाणे दाखल करण्यात आले होते, त्यांना निम्बोनिया सह दमा खोकला आणि शुगर सारख्या बीमाऱ्या होत्या त्यामुळे त्यांची अगदी दोन तासातच काल दिनांक ३० मार्चला प्रकृती खूप बिघडल्याने प्राणज्योत मालवली, मात्र काही सूत्रांनी त्यांचा म्रुत्यु संदिग्ध कोरोना बाधित असल्याने झाल्याचे दाखवले मात्र त्यांची आज दिनांक ३१ मार्चला सकाळी जी रिपोर्ट आली त्यात त्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाला नव्हता हे सिद्ध होते. खरं तर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे चंद्रपूरचा तो म्रुतक कोरोना बाधित नव्हता म्हणून जनतेने घाबरून जावू नये असे प्रशासनाकडून चंद्रपूरच्या जनतेला कळविण्यात येत आहे.
कोरोना या आजाराविषयी कोणतीही खोटे वृत्त प्रकाशित करू नये असे आव्हान यापूर्वीच करण्यात आले आहे परंतु त्याला न जुमानता व्हाट्सअप च्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहे. चंद्रपुरात कोणताही रुग्ण आढळला नसून अशा बातम्यांची शहानिशा केल्याशिवाय what's app ग्रुप सदस्यांनी समोर पाठवू नये.

Post a Comment

0 Comments