अफवांपासून दूर राहा मिळवा खरी आणि अधिकृत माहिती
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन महत्वपूर्ण पाऊले उचलत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वेळच्या वेळी योग्य त्या सूचना देण्यात येत आहे.नागरिकांना कोरोना(कोविड-19) विषाणू संदर्भात योग्य माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत समाज माध्यमे( सोशल मीडिया) सुरू केले आहे.
नागरिकांनी कोरोना आजारा संदर्भात अफवा पासून दूर राहण्यासाठी व अधिकृत माहितीसाठी प्रशासनाने जारी केलेल्या समाज माध्यमांना फॉलो करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
ही असणार अधिकृत समाज माध्यमे:
जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालयाच्या District Corona Control Cell व Dio Chandrapur या फेसबूक पेजला, www.chanda.nic.in या संकेतस्थळाला तसेच @InfoChandrapur या ट्विटर हॅन्डलला, www.diochanda1.blogspot.in या ब्लॉगला फॉलो करु शकता.चंद्रपूर पोलीस विभागाच्या www.chandrapurpolice.gov.in या संकेतस्थळाला, Chandrapur Police या फेसबुक पेजला तसेच @SPChandrapur या ट्विटर हॅन्डलला नागरिकांनी फोलो करा.
जिल्हा परिषद चंद्रपूरच्या www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला तसेच चंद्रपुर महानगरपालिकेच्या www.cmcchandrapur.com या संकेतस्थळाला तसेच chandrapur municipal corporation या फेसबुक पेजला फॉलो करावे.
डॉक्टर,नर्स,फार्मासिटिकल्स, रुग्णवाहिका,आरोग्य विभागाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्यांना कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास चंद्रपूर पोलीस विभागातर्फे 9404872100 हा संपर्क क्रमांक व व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 Comments