चंद्रपूर : शहरातील शहीद हेमंत करकरे (बागला) चौक येथे अब्दुल रज्जाक अली मोहम्मद सुराया रा. रहमत नगर चंद्रपूर येथे कन्फेक्शनरी चे दुकान आहे. देशात लागलेल्या कर्फ्यु च्या पार्श्वभुमीवर हे दुकान मागील काही दिवसांपासून बंद होते. मंगळवार दि. 31 मार्च २०२० रोजी पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्यादी अब्दुल रज्जाक अली मोहम्मद सुराया रा. रहमत नगर चंद्रपूर यांनी तक्रार दिली की बागला चौक (शहीद हेमंत करकरे चौक) चंद्रपूर येथील त्यांच्या कन्फेश्नरी दुकानाला रोज प्रमाणे पाहणी केली असता त्यांच्या दुकानाचे लाकडी दरवाजाचे पल्ले व ताले तुटलेले दिसले व दुकानातील 10, 5, 2, 1 चे कलदार असे एकूण 23650/- रू नगदी कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले, त्यांच्या या रिपोर्ट वरून पो. स्टे. येथे अपराध क्रमांक 243/20 कलम 461, 380 भा. दं.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आणि पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी रवाना होवून आरोपीचा शोध सुरू केला. त्यासाठी प्रथम पोलिस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करीत असताना महावीर नगर, भिवापूर वार्डातील संशयीत आरोपीचा शोध घेवून विचारपूस केली असता त्यांनीच सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलिस स्टेशनला आणून करवाई केली. महाविर नगर येथील आरोपी संदीप मनोहर चौधरी (२४), इरफान सरवर शेख (२२) व भंगारात भिवापूर येथील तनवीर कादीर बेग (१९) यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर चे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पो. उप. नि. सुशील कोडपे, ASI बाबा डोमकावळे, पो. हवा. वंदीराम पाल, किशोर तुमराम, विलास निकोडे, स्वामीदास चालेकर, महेंद्र बेसरकर, सिद्धार्थ रंगारी, ना पो का. पांडुरंग वाघमोडे, पो का. प्रमोद डोंगरे, मंगेश गायकवाड, सचिन बुटले, पंकज शिंदे यांनी करून हा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्हा 5 तासाचे आत उघडकीस आणल्याने शहर गुन्हे शोध पथकाचे उपपोलिस निरीक्षक सुशील कोडापे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा छडा लावला. महत्त्वाचे म्हणजे कोरोना च्या दहशतीने नागरिक आपल्या घरात असतांना व पोलिस विभागावर कर्फ्यु चा अतिरिक्त ताण असतांना ही चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करणाऱ्या पोलिस टिम चे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या