अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती व भाजीपाला नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा - आम. सुभाष धोटे



कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, जिवती, राजुरा, गोंडपिपरी परिसरासह जिल्ह्यातील अनेक गावात शनिवारी रात्री आणि आज रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या शेती व भाजीपाला नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.

       राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावातील भाजीपाल्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना या गारपिटीचा दोरदार फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात कांदा, टमाटर, ढेमसा, काकडी, हळद, पपई अशा विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक हवामानात बदल झाल्याने गारांच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.
       कोरोनामुळे आधीच विविध रोजगारावर कुऱ्हाड चालली असून भाजीपाला व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी सुद्धा निराशा आली आहे. या प्रचंड नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments