दिवा लावून एकसंघतेचे आज चंद्रपुरात घडले दर्शन घडवू


 
चंद्रपुर : आज पाच एप्रिल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर कोसळलेल्या या संकटात धैर्याने समोर जावे यासाठी देशातील जनतेला रात्री नऊ वाजून नऊ वाजता घरातील लाईट मालवून माडीवर किंवा घरासमोर दिवे, मेणबत्ती, टार्च, मोबाईल फ्लॅश लाईट या माध्यमातून बाल्कनीतून प्रकाश करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढयात आपले योगदान द्यावे असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या आव्हानाला आज चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरचे लाईट बंद करून घरासमोर व माडीवर जाऊन दिवे, टॉर्च यांनी प्रकाश करून पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनानंतर अनेक विद्वानांनी आपापले तर्क देत याला स्पष्ट विरोध केला होता. परंतु आज नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद देत  घरातील लाईट बंद करून योग्य प्रतिसाद दिला.
 दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे सर्वांनाच माहित आहे. परंतु या क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते . जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे, हाजी यामागील हेतू होता. परंतु विरोधकांनी विरोध म्हणून याच्या केलेला विरोध यांच्यावर केलेली टीका आहात दोन दिवस चाललेला चर्चेचा विषय होता. आज मात्र याला पूर्णविराम मिळाला असून येणाऱ्या संकटसमयी देशातील जनता असेच येणाऱ्या संकटावर मात करेल हे यावरून स्पष्ट होत आहे. येणाऱ्या समयी भारतीय जनता एकसंघतेने कोरोनावर अशीच मात करेल, यात शंका नाही. संपूर्ण भारता सोबतच महाराष्ट्रातील चंद्रपुरात या आव्हानाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे विरोधकांच्या तर्काला चंद्रपूर करांनी "ठेंगा" दाखवला असेच म्हणता येईल.

Post a Comment

0 Comments