चंद्रपूर शहरात आज पोलिसांचा रूट मार्च, रस्त्यावरील अनावश्यक गर्दी थांबविण्यासाठी रोज होणार रूट मार्च!


 
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनी बिना कामाने बाहेर न पडण्याचे पोलीस अधीक्षकांची आवाहन!

  चंद्रपूर : जटपुरा गेट, गिरणार चौक, पठाणपुरा गेट, बालाजी वॉर्ड असा  पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढला. संपूर्ण पोलीस ताफ्यासोबत काढण्यात आलेल्या या रूट मार्च चे नेतृत्व कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. यावेळी त्यांनी नागरिकांना संदेश देतांना म्हटले की, मागील काही दिवसापासून चंद्रपूरात शिथिलता देण्यात आली आहे पण संचारबंदी मात्र जशी च्या तशी कायम आहे. विनाकारण लोकांनी बाहेर निघू नये, नियमांचे पालन करावे. नागरिकांनी आपल्या घरातच राहावे, संचारबंदीत कुठलीही सूट देण्यात आली नाही, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. हा रूट मार्च आता दररोज शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी काढण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

   मागील दोन दिवसांपासून संचारबंदी कायम असतानाही  नागरिक विनाकारण बाहेर पडत आहे. अंक काल सोमवार दि. 27 रोजी नागरिकांनी जटपुरा गेट परिसरात मोठी गर्दी केली होती. असे प्रसंग पुन्हा घडू नये, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात आज चंद्रपूर पोलिसांनी रूट मार्च काढला.

जिल्हाधिकारी यांनी 3 मे पर्यंत संचारबंदी कायम राहणार, यात कुठलीही सूट दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतरही अनेक लोक दुकाने उघडी झाली असे समजून बाहेर पडत आहेत. काही दुकानदार देखील आपली दुकाने उघडण्यासाठी बाहेर पडत आहे. यामुळे शहरात गर्दी चांगलीच वाढत आहे. जिल्ह्यात सद्यपरिस्थीतीत एकही कोरोनाग्रस्त नसतांना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु आता तसे होताना दिसत नाही, विनाकारण बिना क्रमाने रोग रस्त्यावर निघत आहेत, झुंबड करीत आहे, सोशल डिस्टन्स फज्जा उडवला जात आहे, या गोष्टी ग्रीन झोन मध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी धोकादायक आहेत. सुज्ञ नागरिकांनी शासनाच्या प्रत्येक निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. काही उद्योगांना परवानगी दिली असली तरी त्याठिकाणीही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जाताना ज्यांना महानगरपालिकेतर्फे पास देण्यात आले आहे. त्यांनी बाहेर पडावे असे निर्देश वारंवार करण्यात येत आहे, तरी सुद्धा नागरिक या आव्हानाला झुगारून रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. या गोष्टी भविष्यात घातक ठरणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे काम असल्यास घरून निघावे सोशल डिस्टन्स इन चे नियम पाळावे असे आवाहन यानिमित्त करावेसे वाटते.

बाईट : डॉ. माहेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments