तेलंगानातून कामगारांना जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न! 1 हजारावर कामगारांची विशेष रेल्वे चंद्रपूरात पोहचली


Ø  जिल्हा प्रशासनाकडून जेवण व प्रवासाची व्यवस्था

Ø  14 दिवस होम कॉरेन्टाईन राहण्याचे निर्देश

Ø  कामगारांनी मानले प्रशासनाचे आभार

चंद्रपूरदि.5 मे: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यातील अनेक कामगार तेलंगणामध्ये अडकलेले होते.असे जवळपास 1 हजारावर कामगार तेलंगणातून चंद्रपूरला पोहचले. जिल्हा प्रशासनाने स्वखर्चाने या कामगारांना आपआपल्या स्वगावी सकाळी 9 वाजता त्यांना 25 बसेसतून रवाना केले.

तेलंगणा राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कामगार मिरची तोडण्यासाठी  गेले होते. यामध्ये प्रामुख्याने सावलीनागभीड, कोरपना, जिवती, मुल,सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरीचंद्रपूर, ब्रह्मपुरी या तालुक्यातील 1 हजार 212 कामगार स्वगावी परत आले आहेत. या कामगारांना जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.

अशी होती प्रशासनाची तयारी:

जिल्हा प्रशासन व तेलंगणा मधील प्रशासनांनी समन्वय साधून विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षा तैनात केली होती.

स्टेशनवर आरोग्य पथक तैनात:

रेल्वेतून आलेल्या सर्व कामगारांची आरोग्य तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग व महानगरपालिकेचे आरोग्य पथक सज्ज होते. सर्वप्रथम कामगारांची नोंदणी करण्यात आली तसेच थर्मल स्क्रीनिंगतपासणी व समुपदेशन करून त्यांना होमकॉरेन्टाईनचा शिक्का मारूनच त्यांना पाठविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.

स्वगावी जाण्यासाठी 25 बसेसची व्यवस्था:

तेलंगणा मधून आलेले कामगार हे जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील असल्यामुळे  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी 25 खाजगी बसेसची व्यवस्था केली होती.

फूड पॅकेट व पाण्याची व्यवस्था:

कामगारांसाठी फुड पॅकेट तसेच पाण्याची व्यवस्था कम्युनिटी किचनच्या माध्यमातून करण्यात आली होती. यानंतर कामगारांना बसनी त्यांना स्वगावी पाठविण्यात आले.

जिल्हा प्रशासनाची खास खबरदारी:

जिल्ह्यामध्ये परत आलेले कामगारांना जिल्हातालुका तसेच गावामध्ये आरोग्य तपासणी होऊन त्यांना 14दिवस होम कॉरेन्टाईन रहावे लागणार आहे. या कामगारांवर प्रशासनाची देखरेख असणार असून यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

यावेळीजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारउपजिल्हाधिकारी संपत खलाटे,उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, उपायुक्त विशाल वाघ, तहसीलदार सामान्य संजय राईंनचवारचंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती राजुरवारडॉ.वनिता गर्गेलवार,समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्तीतसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर जिल्हा आरोग्य विभागाचे, महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments