उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या बेधडक कारवाई ने रेती माफिया "वासुदेव" चे धाबे दणाणले!



  • वृत्तमालिकांच्या माध्यमातून रेती चोरीचे "घबाड" उघडकीस!
  • रेती साठा लपवून ठेवलेल्या शेत मालकांवर कारवाई करण्याची मागणी!
  • करोडो रूपयांच्या रेती चोरीच्या कारवाई ची पत्रकारांना शासकीय माहिती देण्याचे आवाहन!
  • भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमताने रेती माफिया "वासुदेव" ने हटवला अनेक ठिकाणचा रेती स्टॉक ?
  • "वासुदेव" च्या बेवारस रेती साठ्यावर शिंदे यांची काल धाड, अनेक रेती साठे केले जप्त!
  • रेती माफिया "वासुदेव" यांचेशी संगनमत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे बिंग फुटणार ?

(भद्रावती विशेष) : भद्रावती चा रेती माफिया वासुदेव याच्या रेती चोरीचे घबाड आता पुर्णपणे उघडकीस आले असून नुकतेच बुधवार दिनांक 13 मे रोजी भद्रावती उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी बेवारस ठेवलेल्या वासुदेव याच्या रेती साठ्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त केला. यापूर्वीही वासुदेवाच्या रेती साठ्यावर कारवाई करून शंभर ब्रास च्या जवळपास रेती शासन जमा करण्यात आली होती. "भूमिपुत्राची हाक" या पोर्टल ने वृत्त मालिकांच्या माध्यमातून व पुराव्यासहित हे प्रकरण लावून धरल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी बेवारस ठिकाणी ठेवलेल्या विविध रेती साठ्यांवर बेधडक कारवाई केल्यानंतर "तोंडात बोटे घालावी" असा रेती माफिया वासुदेव याचा कारनामा उघडकीस आला असून मोठ्या प्रमाणात रेती साठख जप्त करण्यात आल्याचे समजते. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणखीन काही ठिकाणी असलेला रेती साठा हलविण्यात आल्याची विश्‍वसनीय सूत्र आहे. संचार बंदीनंतर रेती साठ्यावर झालेली ही कारवाई सगळ्यात मोठी असल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणावर नदी-नाले उपसून शहरात विविध ठिकाणी रेती माफिया साठेबाजी करत आहेत. यादरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणीही पुढे येत नव्हते उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी भद्रावतीच्या आजूबाजूला जमा असलेल्या रेती साठ्यावर केलेली कारवाई म्हणजे त्यांच्या कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखविणारी आहे. संपूर्ण विदर्भातील सर्वात मोठी ही रेती तस्करी असल्याचे बोलले जात असून विविध ठिकाणी व बेवारस जागेवर ठेवण्यात आलेला रेती साठा जप्त करून त्या-त्या मालकांवर सुद्धा चौकशी करण्यात आल्यास मुख्य सूत्रधार गळास लागण्यात वेळ लागणार नाही, अशी मागणी आता होऊ लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कारवाईची शासकीय अधिकृत माहिती पत्रकारांना देण्यात यावी असा सूरही आता उमटू लागला आहे. रेती माफिया वासुदेव या कारवाईने धास्तावला असल्याचे सांगण्यात येत असून त्याचा राजकीय वशिलाही आता संपुष्टिच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

महत्वाचे म्हणजे पिंपरी, ढोरवासा, तेलवासा आणि चारगाव या परिसरात रेती माफिया वासुदेव ने आपले बस्तान बसवून त्या परिसरात जवळच्या नदीतून रेतीचा उपसा करून मोठ्या प्रमाणात साठवणूक केली होती ही बाब हेरणाऱ्या व त्याचा विरोध करणाऱ्यांना सरळ ते मारण्याची धमकी देवून आपली दादागिरी त्यांनी चालवलेली असल्यामुळे कुणीच त्यांच्या या रेती तस्करी वर बोलायला तयार नाही. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंध व वेकोली प्रशासनाला मैनेज करून पोलिस प्रशासनाला जाणारी हप्ता पुंजी यामुळे वासुदेव चे कुणी काहीच बिघडवु शकणार नव्हते, मात्र बिचाऱ्या अनेक लहान ट्रक्टर चालक मालक यांना छोट्याशा रेती चोरीत सरळ सरळ तहसीलदार दंड ठोठवायचे आणि वासुदेव च्या हायवा नी मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई तहसीलदार यांनी आजवर केली नाही, त्यामुळेच जनहित समोर ठेवून भुमीपुत्राची हाक या न्यूज पोर्टल द्वारे बातम्यांची मालिका सुरू केल्यानंतर कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी पहिली कारवाई करून आपले मनसुबे जाहीर केले होते आणि त्यामुळेच रेती माफिया वासुदेव चे धाबे दणाणले. त्यानंतर कारवाईच्या भीतीने त्यांनी राजकीय लोकप्रतिनिधींना भेटी दिल्या खऱ्या पण लॉक डाऊन च्या काळात रेती चोरी हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांना साथ मिळाली नसल्याने भुमिपुत्राची हाक पोर्टल चे संपादक राजु कुकडे यांच्यासह इतर पत्रकारांना मारण्याच्या धमक्या त्यांच्या समर्थकांकडून मिळत आहे आणि जणू प्रशासन पैशाने विकल्या जाते अशा आविर्भावात ते वावरत असून दादागिरीची भाषा ते बोलत आहे. मात्र उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की या रेती चोरी प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही त्यामुळे आता रेती माफिया वासुदेव यांच्या रेती चोरी प्रकरणासोबतच कर्नाटका एम्टा कोळसा चोरी प्रकरणाची सुद्धा चौकशी होऊ शकते कारण त्यांच्या विट भट्टी परिसरात कर्नाटका एम्टा च्या कोळशाची चुरी पडून आहे, मात्र उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या काल च्या कारवाई ने नेमके या प्रकरणाला कोणते वळण मिळेल ? हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.


सदर धाडसी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात रेती साठा शासन जमा झाला आहे. रेती चोरी करणारे वासुदेव याच्यावर कारवाई झाल्यास करोडो रुपयांचा दंडही वसूल होऊ शकतो. सदर कारवाई ची संपूर्ण माहिती शासनाचे अधिकृत प्रेसनोट काढून पत्रकारांना देण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाने होऊ लागली. ज्या ठिकाणी हा रेती साठा लपवून ठेवला जातो, त्या त्या शेतात मालकाला कारवाईच्या गेल्यात घेतल्यास रेती माफिया वासुदेव याची भिंग फुटण्यासाठी मदत होईल. नुकतीच अशा प्रकारची एक कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील झाली असून त्यामुळे रेती तस्करांची धाबे दणाणले होते. उपविभागीय शिंदे यांच्या या धाडसी कारवाईची कौतुक जिल्ह्यात सर्वच ठिकाणी होत आहे.

Post a Comment

0 Comments