Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

......यासाठी आपले मनापासून आभार !आज रविवार दि. 24 मे रोजी एक लाखापेक्षा (1,00,000) जास्त विश्वासाची वाचक संख्या "विदर्भ आठवडी" या blog ने पुर्ण केली आहे, यात आपला वाटा हा सिंहांचा आहे, त्यासाठी आम्ही सर्वप्रथम आपले मनापासून आभारी आहोत. अन्य portal-blog यांचे करोडोकडे वाटचाल करणारे viewers बघितले तर आईच्या गर्भामध्ये अलटी-पलटी होणाऱ्या अभ्रकासमान आमचा आज हा blog आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असो! आम्हाला कुणाशी स्पर्धा करायची नाही व आमचे कुणी स्पर्धक ही नाहीत.
शुक्रवार दि. 27 मार्च 2020 ला ध्यानीमनी नसतांना ही blog निर्मीत करण्यात आला-झाला. आज याचा 59 वा दिवस आहे. संचारबंदीच्या काळात एकाएकी हा blog साकारला, तत्पुर्वी एखादे web-portal काही अवधीत साकारण्याची योजना आम्ही आखत होतो, जुळवाजुळव करत होतो, अभ्यास करत होतो, परंतु चिन निर्मीत कोरोनाच्या आकस्मिक आलेल्या संकटाने विश्वासाच्या वाचकांसाठी हा blog आकस्मकिचं अवतरला.
पत्रकार व साप्ताहिक वृत्तपत्र "विदर्भ आठवडी" चे संपादक या नात्याने अनेकांशी आलेला संबंध बघता मोबाईल च्या माध्यमातून विश्वासाचे नाते वाचकांशी स्थापित व्हावे व आधुनिक पत्रकारितेची जोड त्याला असावी, असा विचार मनात घर करित होता. तशी कल्पना अनेक वाचकांनी बोलून ही दाखविली होती. अनियमीत असलेले साप्ता. विदर्भ आठवडी मागील काही महिन्यांपासून नियमितपणे आम्ही वाचकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ही झालो होतो. विदर्भ आठवडी चे विविध विषयांवर निघालेले विशेषांक वाचकांच्या स्मरणात राहिले, त्या प्रेमापोटी अनेकांनी विदर्भ आठवडी ची ई-आवृत्ती उपलब्ध करण्याची मागणी ही केली होती. त्याच तयारीत असतांना हे "संकट" आले. आपल्या प्रिय वाचकांना विश्वासाचे तात्पूरते देण्याच्या नादात विदर्भ आठवडी चा blog उदयास आला. अल्पावधीतच विश्वासाचा वाचकवर्ग निर्माण झाला. त्याचा आकडा अवघ्या 59 दिवसात एक लाखापेक्षा जास्त झाला. हे viewers नाही तर विश्वासाचा वाचकवर्ग आहे असे आम्ही संबोधन करू त्याला कारणही तसेच आहे. या संचारबंदीच्या दिवसात अनेकांनी एखाद्या ठिकाणी वृत्त वाचल्यानंतर ही तेच सत्य आहे कां? याची शहानिशा आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून करूनच ते पुढे ढकलण्यात येत होते. अनेकदा तर संवेदनशील कोरोना शी संबंधित असलेले काही विषय आम्ही वृत्त दिल्यानंतरच आमच्या वाचकांनी विश्वासाचे वृत्त म्हणून गृहीत धरले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नुकतेच चंद्रपुरात एकाच दिवशी नऊ कोरोना रूग्ण आढळल्याचे अधिकृत माहिती येण्यापुर्वी वृत्त झळकत होते. जिल्ह्यातील एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी या वृत्ताची सर्वप्रथम आमच्याकडून शहानिशा केली व त्यानंतरच त्यांना यावर विश्वास बसला. असे एकदा नाही तर या काळामध्ये अनेकदा घडले आहे. हीच आमच्या विश्वासाची पावती आहे, असे आम्हाला म्हणावे लागेल, असो ! आपण आमच्यावर विश्वास दाखविला. आज एक लाखापेक्षाही जास्त विश्वासाचा वाचक वर्गामध्ये आपलाही सिंहाचा वाटा आहे, यासाठी पुनश्च एकदा आपले आभार !

  • लवकरच साप्ताहिक "विदर्भ आठवडी" वृत्तपत्र स्वरूपात आपला "कोरोना योद्धां"च्या कामगिरीवर आधारित एक रंगीत विशेषांक प्रकाशित करणार आहोत. त्या विशेषांकासाठी सुज्ञ वाचकांची आपले मनोगत, अनुभव, मत-मतांत्तरे, सुचना व जाहिराती आमंत्रीत आहेत.

आपली मते आपण :(athwadividrbha@gmail.com) या ई-मेल वर किंवा 8149948172 या WhatsApp वर लवकरात लवकर पाठवाव्यात.

राजु बिट्टूरवार, संपादक,
साप्ता. विदर्भ आठवडी, चंद्रपूर

Post a Comment

2 Comments