- 134 पोलिसांची होणार आरोग्य तपासणी!
- 43 पैकी 6 स्वॅब घेतले!
- कृष्णनगर च्या रूग्णांचे 2 स्वॅब तपासणीला!
- दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थिर!जि
- ल्ह्यात 442 नमुन्यांपैकी 2 पॉझिटीव्ह,406 निगेटिव्ह; 34 प्रतीक्षेत!
आरोग्य विभागाकडून आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये दिलेल्या माहितीनुसार कृष्ण नगर येथील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे पूर्णत: सील करण्यात आलेला परिसर मोकळा करण्यात आलेला आहे. सर्व अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती व कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. तर, दिनांक 13 मे रोजी 23 वर्षीय युवतीच्या संपर्कातील अति जोखमीच्या सर्वच 7 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. या परिसरात 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 442 आहे. यापैकी 2नागरिक पॉझिटिव्ह निघाले असून 406 नागरिक निगेटिव्ह आहे. तर 34 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात 989 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 795 नागरिक तर, चंद्रपुर महानगरपालिकेमध्ये 194 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे. तसेच 47 हजार 402 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे. तर जिल्ह्यामध्ये 15 हजार 501 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
0 टिप्पण्या