Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी !चंद्रपूर : सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनता होरपळुन निघाली आहे. शेतकरी नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असतो. परंतु आता मात्र त्यांना कोरोनाच्या सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट आले आहे. कुटुंब चालवायचं कि वीजबिल भरायचं हा मुख्य प्रश्न पडला आहे. त्यामुळे लॉकडाऊन च्या काळातील वीजबिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देशात २२ मार्च २०२० पासून सतत लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्वसाधारण लोकांचे रोजगार बंद होऊन कुटुंबाचे पालन पोषण करणे अतिशय कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मोठया प्रमाणात शेतकरी शकतात सापडला आहे. मालाला किंमत देखील मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्यांना म्हणत असतो परंतु तो आता संकटात सापडला आहे. त्याला मदत करण्यासाठी आपण त्यांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments