Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

बल्लारपूर कचरामुक्त शहराच्या यादीत, मिळाली 3 स्टार रेटींग !  • देशातील सात टाॅप शहरांमध्ये बल्लारपूर !
  • केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने दिले थ्री स्टार रेटींग !

बल्लारपूर (प्रति.)
केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने बल्लारपूर शहराला कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार (कचरा मुक्त शहर ) हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. कोरोना च्या संकटात बल्लारपूर वासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील टाॅपमोस्ट सात शहरांना कचरामुक्त शहराचा थ्री स्टार दर्जा मिळाला आहे, त्यामध्ये बल्लारपूर सोबत नोएडा, विशाखापट्टनम, वड़ोदरा, अहमदनगर, पुणे, ग्वालियर यांना ही ‘थ्री स्टार’ रेटिंग मिळाली आहे.

बल्लारपूर नगर परिषद राज्याचे माजी वित्तमंत्री आम. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या क्षेत्रात येणारी ही नगर परिषद आहे. विविध भाषिय लोकसंग्रह असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराचे देखण्या रेल्वे स्थानकामुळे संपूर्ण भारताच्या पटलावर नावलौकिकास आले. यासोबतचं आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्‍वास आली आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये model म्हणून नावारूपास आली आहेत, यामध्ये बल्‍लारपूर शहरानजिक देशातील अव्वल दर्जाची सैनिकी शाळा, अत्‍याधुनिक स्‍टेडियम, अत्‍याधुनिक बसस्‍थानक, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन असा विविध विकासकामांचा नवा आयाम आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या शहराला दिला आहे. विशेषतः नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन स्‍वच्‍छतेबाबत विशेष काळजी घेण्‍यात आल्यामूळेचं आणि बल्लारपुर शहरातील बांधव व पदाधिकारी यांच्यामुळेचं देशातील top most शहरांमध्ये येण्याचा सन्मान बल्लारपूर शहराला प्राप्त होऊ शकला, त्या सर्वांचेचं आम. मुनगंटीवार यांनी या निमीत्ताने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments