Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

आणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाल्‍याबद्दल भाजयुमो चंद्रपूरने पाळला काळा दिवसआणीबाणीला प्रखर विरोध करणा-या नेत्‍यांना, वीरांना केले वंद

25 जून 1975 मध्‍ये तत्‍कालीन पंतप्रधानांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्‍या घटनेला 45 वर्षे पूर्ण झालीत. या आणीबाणीला प्रखर विरोध करत ज्‍या नेत्‍यांनी, वीरांनी तत्‍कालीन सरकारला धारेवर धरले, तुरूंगवास पत्‍करला त्‍यांना वंदन करत 25 जून हा दिवस चंद्रपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे काळा दिवस म्‍हणून पाळण्‍यात आला.

यानिमीत्‍ताने गिरनार चौकात भाजयुमो पदाधिकारी व कार्यकत्‍यांनी हाताला काळया फिती लावून निषेधात्‍मक भावना व्‍यक्‍त केली. यावेळी भाजयुमोचे सुरज पेदुलवार, प्रज्‍वलंत कडू, मनोज पोतराजे, कुणाल गुंडावार, यश बांगडे, अक्षय खांडेकर, शुभम सुलभेवार, सचिन यामावार, स्‍नेहीत लांजेवार, अक्षय नवाथे, कृष्‍णा चंदावार, चंदन पाल, राकेश बोमनवार, योगेश कुचनवार, शशांक डाखरे, भूषण पाटील, अभिषेक पवार, साजिद पठाण, पवन श्रावणे, पराग मलोडे आदींची उपस्थिती होती.

आणीबाणी च्‍या काळात तत्‍कालीन पंतप्रधानांनी जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नाडिस आदी राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले, प्रसार माध्‍यमांच्‍या अधिकारांवर गदा आणली. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली. मात्र यासर्व संघटनांनी नेत्‍यांनी आणीबाणीच्‍या विरोधात ठामपणे संघर्ष केला. या संघर्षाचे स्‍मरण म्‍हणून व या वीरांना नमन म्‍हणून हा दिवस आम्‍ही काळा दिवस पाळत असल्‍याचे भाजयुमोचे सुरज पेदुलवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

Post a Comment

0 Comments