कर्जमाफीच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डवर लावा- खासदार बाळू धानोरकर



चंद्रपूर : शासन धोरणानुसार कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिल्याच्या तक्रारी प्राप्त आहे. अनेक पात्र किंवा अपात्र शेतकऱ्यांना बँकेतील अधिकाऱ्यांकडून माहिती दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डवर लावण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील बँकांना कर्जमाफी मिळालेला शेतकऱ्यांना योग्य माहिती दिल्या जात नाही. शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीच्या पात्र आहोत कि नाही. हे देखील ठाऊक नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी खासदार बाळू धानोरकर यांना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी समाजातील मुख्य घटक आहे. त्यांना कुठल्याच प्रकारच्या त्रास होता काम नये म्हणून खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून बँकेच्या नोटीस बोर्डवर कर्जमाफीच्या याद्या लावण्याची विनंती केली. या मागणीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या