"त्या" आगीत नऊ कोटी रूपयांचे नुकसान !चंद्रपूर : पडोली एमआयडीसीमधील रासबिहारी अॅग्रो प्रोसेसिंग प्रा. लिमि. या जिनिंग व प्रोसेसिंगला शनिवार दि. ३०मे ला आग लागली. यात सुमारे सहा हजार क्विंटल व साडेतीन हजार कापसाच्या गाठी यासह काही मशीन्स जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रासबिहारी अॅग्रो प्रोसेसिंग प्रा. लिमि. या जिनींगला सकाळच्या सुमारास आग लागली. जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होता. कापसालाच आग लागल्यामुळे आग क्षणार्धात व्यापक स्वरुपात पसरली.

जिनिंग मधील सुमारे सहा हजार क्विंटल व साडेतीन हजार कापसाच्या गाठी यासह काही मशीन्स जळून खाक टाल्या आग वडविण्यासाठी विविध ठिकाणाहून अग्निशामक पथकांना पाचारण करण्यात आले. दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतरही धूर निघत असल्याने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे. चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांनी या जिंनींग ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment

0 Comments