- जागतिक रक्तदान दिनाच्या औचित्याने 347 रक्तदात्यांनी केले रक्तदान !
- 18 वर्षाच्या कु. चिकीता बोम्मावार चा स्वेच्छेने सहभाग!
स्वत: रक्तदान करून पाल्यासही रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचे बोम्मावार यांचा मौल्यवान संदेश !
चिकिताची ही पहिलीच वेळ असून त्यांचे वडील रवींद्र बोम्मावार यांची 6 (सहावी) वेळ आहे. रवींद्र बोम्मावार हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून साहित्य व कवी आहे. त्यांचा संदेश ही महत्वाचा आहे त्यानी म्हटले की प्रत्येकांनी रक्तदान करून आपल्या पाल्यासही रक्तदानाचे महत्व पटवून प्रबोधनात्मक आत्मविश्वास निर्माण करणे कोविड-19 नंतरच्या जगण्यासाठी काळाची गरज आहे. असे प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वणी : 'रक्तदान हे श्रेष्ठ दान' आहे म्हणून जागतिक रक्तदान च्या निमित्याने वणी येथे बाप-लेकी ने रक्तदान करून सामाजिक ऋण फेडण्याचे महान कार्य घडविले.
जागतिक रक्तदान दिनाच्या औचित्यावरवणी विधानसभा भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने वणी येथील अटलबिहारीवाजपेयी सभागृहात "कोरोना" साथीतरक्ताची कमतरता पडू नये या उद्देशातून यवतमाळ भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून पार पडला. शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.एकून 347 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मात्र त्यात नुकतेच 18 वर्ष पूर्ण केलेली कु.चिकिता रविंद्र बोम्मावार आपल्या वडिलांसोबत स्वेच्छेने रक्तदान करतांना पाहून सर्वांच्या नजरा वळल्या.
या शिबिरात माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजभैयाअहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच अनेकांनी चिकीताशी विशेष संवाद साधून प्रेरणादायी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीते साठी भाजपा पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments