चंद्रपूर : चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार अजय भास्करवार हे रविवारी सकाळी कामानिमित्त कारने चिचपल्ली येथे गेले होते. कामे आटोपून परत येत असताना चिचपल्ली जवळील वलनी फाट्याजवळ त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडाला आदळली. यात ते गंभीररित्या जखमी झाले. याच मार्गावरून जाणाऱ्या काही व्यक्तींना हा अपघात दिसला. त्यांनी लगेच भास्करवार यांना कारमधून काढून चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. ही घटना रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास चिचपल्ली जवळ घडली.
उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
नुकतेच काही दिवसांपूर्वी तेलंगणा येथून काही स्थानिक मजुरांना चंद्रपूरात आणण्यात आले होते, त्यावेळी शासकीय अधिकारी या नात्याने येणाऱ्या ची जबाबदारी भास्करवार यांचेकडे होती. त्यावेळी त्यांच्यासोबत झालेली भेट ही शेवटची भेट होती. महत्त्वाचे म्हणजे तेलंगाना येथून आलेल्या या स्थानिक मजुरांबद्दलची माहिती पत्रकारांनीच प्रशासनाला दिली होती. अजय भास्करवार यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
0 टिप्पण्या