पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री नाम. वडेट्टीवार यांचे प्रतिपादन!
जिल्ह्यामध्ये ९० पेक्षा अधिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे ब्रिज कम बंधारे तयार करून जलसंधारणाचे काम करण्यात येणार असून जिल्ह्यातील ६५९ पैकी २८३ कोल्हापुरी बंधान्यांची दुरूस्ती पाटबंधारे विभागाच्या मार्फतीने करण्यात येणार असून जुन्या लोखंडी दरवाज्याऐवजी आधुनिक फायबर चे दरवाजे याठिकाणी लावण्यात येतील. तसेच कृषी विभागाला खरीप हंगामाची तयारी व सिंचन लाभ क्षेत्रात नविन पिक पद्धती बदलासंदर्भात विचार करण्यात येणार असून शास्वत संरक्षित शेतीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार येणार असल्याची माहिती आज बुधवार दि. २४ जुन रोजी नियोजन भवन, चंद्रपूर येथे कोरोना आढावा संबंधात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
अवैध दारूविक्रीसंदर्भात पोलिस अधिका-यांना धरण्यात येईल जबाबदार ?
चंद्रपूर : पत्रकारांनी दारूबंदीसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना पालकमंत्र्यांनी यानंतर अवैध दारू विक्री होतांना आढळल्यास त्या-त्या क्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांची वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती देत जिल्ह्यात दारूबंदी सपशेल अपयशी ठरली असल्याचे सुतोवाच केले. यासोबतचं आपण अवैध दारू विक्री संबंधात कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत पोलिसांनी ७ कोटीच्या जवळपास दारू पकडली असून त्यापेक्षा जास्त प्रमाणात दारू विकल्या गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगतचं मोठ्या प्रमाणात विषारी दारू चा पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक आजार बळावले असून कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर जिल्ह्यामध्ये दारूबंदी हटविण्यासंबंधात योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याची स्पष्ट कबुली या पत्रकार परिषदेत दिली. तसेच डुप्लिकेट बिटी बियाणांच्या येणाऱ्या तक्रारीवर नियंत्रणासाठी आता अशा प्रकरणात विक्रेत्यांसोबतचं उत्पादन करणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट केले. सोबतचं रेती तस्करीसंबंधात मागील वर्षात ४६२ गुन्हे दाखल झाले तर १४ एफआयआर व २६० वाहने रेती तस्करीमध्ये जप्त करण्यात आल्याची माहिती दिली तसेच चालु वर्षात आत्तापावेतो ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५९ लाख रूपयांची वसुली करण्यात आली तर ४० वाहने रेती तस्करीमध्ये जप्त करण्यात आले आहेत, तर नुकत्याच रेती तस्करीमध्ये एका राजकीय युवा नेत्यांच्या समावेशाबद्दल बोलतांना पालकमंत्र्यांनी रेती तस्करीमध्ये पकडण्यात आलेले वाहन हे त्यांचे असले तरी ते त्यांनी कुणाला तरी किरायाने दिले असल्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे सुतोवाच केले.
यावेळी पालकमंत्री बोलतांना पुढे म्हणाले की, चंद्रपूर, वरोरा, कोरपना याठिकाणी एपीएमसीने मोठे शेड उभारले असून याठिकाणी तुर, चना यांची खरेदी सुरू आहे. एका आठवड्यात ही खरेदी पुर्ण होणार असल्याचे सांगत २ हजार ५८० किंटल मका खरेदी, ८.३२ लक्ष क्विंटल धनाची खरेदी, रब्बी ७७ हजार ८४१ हजार किलोची खरेदी पुर्ण झाली असून धानाची खरेदी सुरू असल्याची माहिती ही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. सोबतच आत्तापावेतो शेतकऱ्यांना ४४२ कोटी रूपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे माहिती त्यांनी दिली. शेतकन्यांना कर्जाविषयीच्या अधिक माहितीसाठी शासनाने टोल फ्रि क्रमांक जाहिर केले असून अधिक माहितीसाठी ०७१७२-२५०३८१ व २५५२२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यात जून महिन्यात ९३ हजार ३२३ क्विंटल धान्य वाटप (९३.०९%) करण्यात आले आहे. यामध्ये केशरी शिधापत्रिका धारकांना २ हजार ६७५ क्विंटल तर मोफत ६० हजार ६२२ क्विंटल तांदुळ व ५ हजार ३१७ किंटल डाळीचे वाटप करण्यात आले आहे. मंगल कार्यालयाला परवानगी देण्यात आली असून ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लगाम लागलेल्या ग्रामसभांचे आयोजन ही शासनाच्या नियमांचे पालन करून घेण्यात याव्यात. यामध्ये विशेषतः सोशल डिस्टन्सिंग, मॉस्क यांचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments