मुल चे सेवानिवृत्त शिक्षक जिरकुंटवार यांच्यावर न.प. प्रशासनाकडून अन्याय !  • आश्र्वासन देऊन ही तक्रारींकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष !
  • न.प. प्रशासन हेतुपूरस्सर त्रास देत असल्याचा जिरकुंटवार यांचा आरोप !

मूल : नगर परिषद मूलने अर्धवट रस्ता नाली बांधकाम केल्याचा फटका एका सेवानिवृत्त शिक्षकास बसत असून, सतत पाच वर्षापासून याची तक्रार करूनही, प्रशासन दखल घेत नसल्यांचा आरोप केल्या जात आहे. वसंतराव जिरकुंटवार असे शिक्षकांचे नांव आहे मागील पाच वर्षापासून ते सतत प्रशासनाकडे आपली समस्या मांडत आहे, मात्र असंवेंदनशील झालेले नगर प्रशासन कुंभकर्णी झोपेतच आहे. उल्लेखनीय म्हणजे, या रस्त्याचे व नालीचे काम करण्यांचे नपचे मुख्याधिकारी यांनी ‘हॅलो चांदा’ च्या दिलेल्या तक्रारीवर मान्य केले, मात्र अमंलबजावणी अजूनही न झाल्यांने, येत्या पावसाळयात या कुटूंबियांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

स्थानिक नवभारत गृहनिर्माण सोसायटी, रामपूर तुकूम वार्ड क्र. १५ मूल, येथे मंजूर लेआऊटमध्ये श्री. वसंतराव जिरकुंटवार यांचे निवास आहे. हा लेआऊट मंजूर असून, नकाशाप्रमाणे लेआऊटमध्ये रस्ते स्पष्ट दर्शविण्यात आले आहे. नगर परिषदेच्या अभियंत्यांने चुकिच्या रस्त्याचे काम केले आणि आपली चुक लपविण्याकरीता, त्यांनी जिरकुंटवार यांचे घरासमोरून सुरू झालेला रस्ता अर्धवट ठेवला. यामुळे, लेआऊटमधील सर्व पाणी त्यांचे घरासमोर जमा होते, यात घाण पाण्यांचाही समावेश असल्यांने, आरोग्यांच्या प्रश्न निर्माण होत आहे.

अर्धवट रस्त्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी श्री. जिरकुंटवार यांनी २०१५ पासून सतत करीत आहे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी, ऐवढेच काम मंजूर होते, उर्वरित काम प्रस्तावित असल्यांचे दोन वर्षापूर्वीच मान्य केले. हे काम होणे आवश्यक असल्यांचेही त्यांनी मान्य केले, मात्र तब्बल दोन वर्ष होवूनही या प्रस्तावाचे काय झाले हे कुणी सांगायला तयार नाहीत.
स्थानिक नगर परिषदेचे याच प्रभागातील नगर सेवक आपल्या घरासमोरील रस्ते वारंवार फोडून दुरूस्त करतात, मात्र एवढया लहान कामासाठी, नगर परिषद आपल्याला त्रास देत आहेत, असा आरोप जिरकुंटवार यांनी केला आहे.

एकीकडे सिनीयर सिटिझनचा शासन स्तरावर सन्मान केला जात असले तरी, मूल नगर परिषदेत मात्र जेष्ठ नागरीकांना देण्यात येत असलेली वागणूक संतापजनक आणि नगर परिषदेची गैरजबाबदारी दाखविणारी आहे.


न.प. ने या लेआऊट मध्ये अर्धवट नाली व रस्त्याचे काम केल्यांने, इथे पाणी साचून राहते. या पाण्यात काही दिवसापूर्वी एक गाय पडली होती व अनेक नागरीकांनी एकत्र येत या गायीला बाहेर काढून वाचविले होते. भविष्यात एखादया लहान मुलांबाबत अशी घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही या निमीत्ताने उपस्थित झाला आहे.

Post a Comment

0 Comments