आम. सुभाष धोटेंच्या हस्ते माणिकगड किल्ल्यावर निसर्ग निर्वाचन केंद्राचे लोकार्पण



माणिकगड किल्ल्याच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी प्रयत्न करणार -आ. सुभाष धोटे
गडचांदुर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभाग – मध्य चांदा वनपरिक्षेत्र जिवती तालुक्यात माणिकगड किल्ल्याच्या सौंदर्य व अभ्यासात भर घालणाऱ्या निसर्ग निर्वाचन केंद्राचे लोकार्पण मा. आमदार सुभाष धोटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
   या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार धोटे म्हणाले की, २००९ ते २०१४ च्या  आपल्या कार्यकाळात आपण ऐतिहासिक माणिकगड किल्ल्याचे जतन व सुशोभीकरण करण्यासाठी व येथे पर्यटण स्थळ निर्माण करण्यासाठी ३ ते ४ कोटी रुपये पर्यंतची विकास कामे केलीत. त्यामुळे येथील सौंदर्यत भर पडली. जिवती तालुका निसर्गाच्या दृष्टीने सुजलाम सुखलाम आहे. येथील पर्यावरण हे अतिशय आरोग्यदायी आहे. येथील सौंदर्य, पर्यावरणाचा लाभ सर्वांना व्हावा, येथे येणाऱ्या पर्यटकांना परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आणि अन्य माहितीचे ज्ञान व्हावे यासाठी हे केंद्र असून ते निश्चितपणे महत्त्वाचे ठरणार आहे. येथील सौंदर्यत आनखी भर घालण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
        या प्रसंगी संत कबीर जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेला आमदार सुभाष धोटे यांनी अभिवादन केले. तर पर्यावरण दिनाचे महत्त्व लक्षात घेता कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत वृक्षांचे रोप देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदारांच्या हस्ते वटवृक्षाचे पुजन करण्यात आले व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 
        या प्रसंगी राजेंद्र हिरे उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर, प्रशांत बेडसे तहसिलदार जिवती, वन परिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी, नानाजी पाटील मडावी अध्यक्ष संयुक्त व्यवस्थापन समिती मारोतीगुडा, सुग्रीव गोतावळे माजी. पं. समिती सदस्य, भीमराव पवार, दत्ता राठोड, यासह वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments