- उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 112 !
- 148 बाधित कोरोनातून बरे !
- शुक्रवारी सर्वाधिक 25 बाधित !
- राज्य राखीव पोलीसदलाच्या पाच जवानांचा समावेश !
चंद्रपूर,दि. 18 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 260 झाली आहे. शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी आतापर्यंतचे सर्वाधिक 25 बाधित पुढे आले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा 17 रुग्ण पुढे आले आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये राज्य राखीव दलाच्या एकूण 5 जवानाचा सहभाग आहे. अनुक्रमे 27, 30, 31, 31, 36 वर्षीय हे 5 जवान पुणे येथून चंद्रपूर येथे आले आहेत. 15 जुलैला या जवानाचे स्वॅब घेण्यात आले होते. आज ते पॉझिटिव्ह ठरले आहे. आजच्या 5 जवानासह आतापर्यंत राज्य राखीव दलाच्या चंद्रपूर मध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण 16 जवान कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहे. ऊर्जानगर परिसरातील लेबर कॉलनी मधील ओडिसा राज्यातून नागपूर मार्गे परत आलेल्या 17 वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवतीला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. चंद्रपूर येथील एकवीरा मंदिर जवळील बाबुपेठ तुकडोजी चौक परिसरातील 32 वर्षीय व्यवसायिक पॉझिटिव्ह ठरला आहे. नागपूर वरून प्रवास केल्याची यांची नोंद असून संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात आले होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला आज पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील आजाद चौक भागात राहणाऱ्या 31 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गृह अलगीकरणात असणारा हा युवक संपर्कातून कोरोना संक्रमित झाल्याचे पुढे आले आहे. चंद्रपूर शहरातीलच रहिवासी असणाऱ्या मात्र ऊर्जानगर येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात थांबलेला 32 वर्षाचा युवक पॉझिटिव्ह आला आहे. बल्लारपूर शहरातून आज तीन पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. यामध्ये 37 वर्षीय डब्ल्यूसीएल कॉलनी मधील महिलेचा समावेश आहे. हैदराबाद येथून रेल्वेने आल्यानंतर त्या गृह अलगीकरणात होत्या. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डब्ल्यूसीएल कॉलनीचा रहिवासी असणारा 25 वर्षीय युवक देखील पॉझिटिव्ह ठरला आहे. हा युवक हैदराबाद येथे एका कंपनीमध्ये काम करत होता. 14 जुलै रोजी रेल्वेने परत आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. त्याचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. बल्लारपूर येथील तिसरा पॉझिटिव्ह हा बालाजी वार्ड बल्लारशा टीचर कॉलनीमधील असून 38 वर्षीय व्यवसायिक आहे. राजस्थान वरून 8 जुलै रोजी बल्लारपूर येथे पोहोचल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. भद्रावती शहरातून देखील आज तीन पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. यामध्ये काझीपेठ येथे कार्यरत असणारा 26 वर्षीय व्यावसायिकाचा समावेश आहे. भद्रावती येथील स्नेहल नगर परिसरातील रहिवासी असणारा हा युवक काझीपेठ वरून रेल्वेने आला होता. हैदराबाद येथील एका इस्पितळात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा भद्रावती तालुक्यातील भानगाव येथील रहिवासी असणारा 29 वर्षीय व्यक्ती 12 जुलै रोजी हैदराबाद वरून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. 16 तारखेला त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. तो आज पॉझिटीव्ह ठरला आहे.
भद्रावती येथील गुरूमोथल कॉलनीत राहणारा 23 वर्षीय युवक काझीपेठ येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. अँटीजेन चाचणीमध्ये तो देखील पॉझिटिव्ह ठरला आहे. तर पाटणा बिहार येथील रहिवासी असणारा 48 वर्षीय व्यक्ती 8 तारखेपासून संस्थात्मक अलगीकरणात होता. त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथील रहिवासी असणाऱ्या 46 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारा हा व्यक्ती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरल्याचे पुढे आले आहे.
जिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित ) व 18 जुलै ( एकूण 17 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 260 झाले आहेत. आतापर्यत 148 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 260 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 112 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.
0 टिप्पण्या