गडचांदूर न.प.चे घनकचऱ्याचे कंत्राट असलेल्या कंत्राटदारांकडून नियमांची पायमल्ली !  • कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचेवर करारनाम्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात यावा!
  • कंत्राटदारासोबत गडचांदूर येथील नगरसेवक व पदाधिकारी यांची मिलीभगत !
  • गडचांदूर न.प. प्रशासन आता गप्प का? नागरिकांचा सवाल!
  • गडचांदूर न.प. स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडला, याला दोषी कोण?

गडचांदूर : युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था यांना जानेवारी 2019 मध्ये गडचांदूर शहराच्या घनकचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले होते, हे कंत्राट देताना कंत्राटदारासोबत करारनामा करण्यात आला होता. मागील एक वर्षात कंत्राटदाराने स्वच्छतेकडे दुर्लक्ष व करारनाम्याच्या नियमांची पायमल्ली केली, तरी सुद्धा राजकीय व प्रशासकीय अभय असल्यामुळे कंत्राटदाराच्या पाठीशी पूर्ण न.प. प्रशासन उभी असल्याचे चित्र दिसत आहे, करारनाम्याची पायमल्ली, स्वच्छतेकडे दुर्लक्ष, अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे कंत्राटदाराला काळ या यादीत टाकण्यात यावेत अशी मागणी आता गडचांदुरच्या नागरिकांकडून होत आहे.
या भोंगळ कारभारामुळे गडचांदुर नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पिछाडला आहे, नगरसेवक, पदाधिकारी व व कर्मचारी यांच्यामुळे कंत्राटदाराला अभय देण्यात आले परंतु स्वच्छता अभियानात गडचांदूर माघारला, भविष्यात गडचांदूर व न.प. ला येणारा विशेष निधी येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो ही बाब बहुतेक भ्रष्ट नगरसेवक व कर्मचारी विसरत आहेत, आपण गडचांदूरवासियांसोबत धोखाधडी करीत आहेत, यांची जाण या भ्रष्टांना असायला हवी.

सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर स्वच्छ गडचांदुर नगरी व्हावी, यासाठी सदर कंत्राट देण्यात आले. कंत्राट देतांना करारनामा करून काही नियम व अटी त्यात टाकण्यात आल्या व त्याच अटी व शर्तीवर घनकचरा गोळा करण्याचे हे कंत्राट देण्यात आले. यामध्ये मुख्यत्वेकरून शासकीय नियमाप्रमाणे सुका व ओला कचरा वेगवेगळ्या जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी हा मुद्दा होता सोबतच घंटागाडी च्या माध्यमातून कचऱ्याची उचल व्हावी व त्याची नियमाप्रमाणे कंत्राटदाराने पालन करावे तरच त्याला मान्यता राहील असा स्पष्ट उल्लेख या करण्यात करण्यात आला होता. सोबतच न.प. प्रशासनाच्या घंटागाड्या हत्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करतील, या घंटागाड्यांची देखभाल, दुरुस्ती हे कंत्राटदाराला दिलेल्या कंत्राटात नमूद होते, आणि विशेष बाब म्हणजे या घंटागाड्या आज भंगारमध्ये पडलेल्या आहेत त्यांची कोणतीही दुरुस्ती न करता जोपर्यंत त्या चांगल्या अवस्थेत होत्या तोपर्यंत त्या वापरण्यात आल्या नंतर त्याला भंगारात टाकण्यात आले. करारनाम्यामध्ये यावरही दंड आकारण्यात आला आहे. न.प. प्रशासनाने असा कोणताही दंड कंत्राटदाराकडून आकारला नाही. ओला व सुखा कचरा जमा करून तो डम्प करण्यात आला, त्यामुळे गडचांदुर नगरीत अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली. गडचांदुर न.प. प्रशासनाने याबाबतीतही करारनाम्यामध्ये उल्लेखित नियम व अटी पालन न केल्याच्या कारणावरून कारवाई करायला हवी होती परंतु संत्रा झाला न.प. प्रशासनाने अभय दिले. महत्त्वाचे म्हणजे 1000, 500 व 50 रूपये याप्रमाणे दररोज दंड आकारण्याचा नियम असतानासुद्धा कंत्राटदाराला मिळालेले अभय "कुछ तो गडबड है दया!" हे दर्शविणारा आहे. गडचांदूर नगर परिषद प्रशासनाने घनकचऱ्याचे कंत्राट असणाऱ्या युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था या कंत्राटदाराच्या कामकाजाची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकुन त्यांचेवर करारनाम्यामध्ये उल्लेखित दंड वसुल करावा, अशी मागणी गडचांदूरवासी करीत आहेत.


Post a Comment

0 Comments