आज जिल्ह्यात 7 बाधित, एकंदर आतापर्यंतची बाधित संख्या १६९ !



(चंद्रपूर कोरोना अपडेट)

  • चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे !
  • हैदराबाद बिस्कीट कारखान्यातील तिघे पॉझिटीव्ह !
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ९४ बाधित कोरोना आजारातून बरे झाले आहेत. ७५ बाधितावर सध्या उपचार सुरू असून या सर्वांची प्रकृती देखील ठीक आहे. आत्तापर्यंत बाधिताची संख्या १६९ झाली आहे.
सध्या उपचार सुरु असणाऱ्या ७५ बाधितांपैकी ४ हे जिल्ह्याबाहेरील रुग्ण असून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहे. काल शुक्रवारी एकाच दिवशी १२ बाधित पुढे आले होते. यामध्ये लग्नामध्ये सहभागी झालेल्या ५ जणांचा समावेश होता.

आज शनिवारी एकाच दिवशी ७ पॉझिटिव्ह पुढे आले असून यापैकी तीन जण हैदराबाद येथील एका बिस्कीट फॅक्टरीमध्ये कार्यरत होते. हैदराबाद येथून प्रवासाची नोंद असलेल्या बाधितांमध्ये मूल तालुक्यातील गडीसूरला येथील २० व ३० वर्षीय युवकांचा समावेश आहे. यांच्या सोबतीला चंद्रपूर येथील बगल खिडकी परिसरातील २४ वर्षीय युवक आहे. हे तीनही युवक ८ जुलैला हैदराबाद वरून आले आहेत. या युवकांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. हे तिघे देखील यापूर्वीच्या गडीसुरला येथील पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील होते. एकाच फ्लॅटमध्ये राहणारे हे सर्वजण पॉझिटिव्ह आले आहे. १० तारखेला यांचे स्वॅब घेण्यात आले होते.
       याशिवाय गृह अलगीकरणात असणारा ताडाळी येथील ३० वर्षीय पुरुष, संस्थात्मक अलगीकरणात असणारी ऊर्जानगर येथील २४ वर्षीय महिला. संस्थात्मक अलगीकरणात असणारा घुग्घुस येथील १४ वर्षीय मुलगा आणि चिमूर तालुक्यातील नेरी येथील ४५ वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांची बाहेरून प्रवास केल्याची नोंद आहे. बिस्किट कंपनी काम करणारे वरील तिघे आणि वेगवेगळ्या शहरातून प्रवासाच्या नोंदी असणारे अन्य चार असे मिळून आज एकूण सात जण पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे. 
आत्तापर्यंत ९४ नागरिकांना कोरोना आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले असून ७५ बाधितांवर उपचार सुरू आहे. दरम्यान , जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार  चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) ६ जुलै ( एकूण ७ )  ८ जुलै ( एकूण ५ )  ९ जुलै ( एकूण १४ ) व १० जुलै ( एकूण १२ )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १६९ झाले आहेत. आतापर्यत ९४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १६२  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ७५ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या