आज ब्रम्हपूरीत मिळाले 8 बाधित !



  • चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 110
  • मास्क वापरणे अनिवार्य;
  • जिल्ह्यात दंडात्मक कारवाई सुरू
  • आतापर्यंत 56 कोरोनातून बरे
  • ब्रम्हपुरी शहरात 14 पर्यंत लॉकडाऊन;
  • जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार
  • उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 54
  • 982 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
  • 2 हजारांवर नागरिक गृह अलगीकरणात

चंद्रपूर,दि. 3 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसात 110 वर पोहोचली आहे. ब्रह्मपुरीत एकाच दिवशी आज आठ बाधित पुढे आले. दरम्यान अधिक उद्रेक असणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्याचा दौरा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी गुरुवारी केला. त्यानंतर आज त्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ग्रामीण भागात मास्क वापर अनिवार्य करण्यात यावा, तसेच बाहेरून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

सोबतच ब्रह्मपुरी शहरात 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. शहरात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व शेतीसंदर्भातील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी दुकाने पुर्नत: बंद असतील.

जिल्ह्यात गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 102 झाली होती. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी भर पडली असून ब्रह्मपुरी तालुक्यातून एकूण 8 पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 आहे. तर आतापर्यंत कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 56 आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी शहरातील दोन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. भवानी वार्ड येथील 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.अन्य दोन रुग्ण गांगलवाडीचे असून यामध्ये 49 वर्षे पुरुष व 37 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील 30 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यातील निलज या गावातून देखील तीन वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे. तर चौगान येथील 32 वर्षीय पुरुषाचा यामध्ये समावेश आहे. आजच्या 8 बाधितांपैकी 2 बाधित हे अनुक्रमे मुंबई आणि हैदराबाद येथून आले आहे. तर अन्य 6 बाधित जोखमीच्या संपर्कातील आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

तत्पुर्वी, गुरुवारी रात्री चार पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्री उशीरा दिलेल्या माहितीनुसार चारही बाधित गृह व संस्थात्मक अलगीकरणातील आहे.

  चार नव्या बाधितामध्ये वरोरा येथील कासम पंजा वार्डमधील संपर्कातील 34 वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. तर चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर भागातील नवी दिल्ली येथून आलेला 33 वर्षीय पुरुष, तुकुम भागातील सिकंदराबाद येथून आलेल्या 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ऊर्जानगर व तुकूम परिसरातील दोन्ही बाधित संस्थात्मक अलगीकरणात होते. तर चौथा बाधित गडचांदूर येथील एसीसी कॉलनीतील रहिवासी आहे. हा 24 वर्षीय व्यक्ती दिल्लीवरून कोरपना तालुक्यातीत गडचांदूर अवालपूर येथे आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. 1 जुलैला चारही नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 5 हजार 548 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 110 नमुने पॉझिटिव्ह, 4 हजार 718 नमुने निगेटिव्ह, 686 नमुने प्रतीक्षेत तर 34 नमुने अनिर्णीत  आहेत.

जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:

जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 982 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 175 नागरिक,तालुकास्तरावर 370 नागरिक तर, जिल्हास्तरावर 437 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजार 370 नागरिक दाखल झाले आहेत. 82 हजार 77 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 293 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जूलै (एकूण चार बाधित) आणि 3 जूलै (एकूण 8 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 110 झाले आहेत. आतापर्यत 56 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  110 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 54 आहे.

Post a Comment

0 Comments