गडचांदूर मध्ये "माणिकगड सिमेंट कंपनी" ला वगळून "लॉक डाऊनडाऊन" चे राजकारण!



  • सिमेंट कंपनीबाबत न.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांची संशयास्पद घुमजाव भूमिका!
  • अखेर उद्यापासून गडचांदूरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यु?
  • ही तर सत्ताधाऱ्यांची बेबंदशाही-नगरसेवक अरुण डोहे!
  • आरोग्य सभापती सौ. जयश्री ताकसांडे यांचा अफलातून आदेश!

अखेर उद्यापासून गडचांदूरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यु?

सोमवार दि. 27 व मंगळवार 28 या दोन दिवसाचा गडचांदूर मध्ये जनता कर्फ्यु पाळण्याचा आज रविवार दि. 26 रोजी एका सभेत निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार गडचांदुर व्यापारी असोसिएशनने आज न.प. सभागृहात सभा घेऊन स्वेच्छेने 27 व 28 रोजी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे घोषित केले. या सभेचे आयोजन हा ही एक संशोधनाचा विषय आहे, सभेचे आयोजन कोणी केले आणि आववाहन कोणी केले, याबाबत मात्र वेगवेगळा मतप्रवाह व्यक्त होत आहे. कोरोना संक्रमणाची साखळी (?) तोडण्यासाठी जनता कर्फ्यु पुकारण्यात आला असल्याचे सांगण्यात येत असून आयोजित करण्यात आलेल्या या सभेला नियमांना पाठ दाखविण्यात येऊन 50 पेक्षा जास्त लोकांची याठिकाणी उपस्थिती असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. भाजप नगरसेवकांनी मात्र हा जनता कर्फ्यु चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

आरोग्य सभापती सौ. जयश्री ताकसांडे यांचा अफलातून आदेश!


गडचांदूर नगर परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. जयश्री राऊत-ताकसांडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ रिलीज करून त्यामध्ये जनता कर्फ्युचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे फर्मान सोडले. परंतु ती कारवाई कोणती राहील याबद्दल जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून असा काही अधिकार आरोग्य सभापतींना आहे कां? याबद्दल विविध चर्चांना आता गडचांदुर मध्ये पेव फुटला आहे.

गडचांदूर : गडचांदुर मध्ये आतापावेतो मिळालेली बाधितांची आकडेवारी ही चक्रावणारी आहे. 1 आठवड्यापूर्वी गडचांदुर न. प. च्या अध्यक्षा सौ. सविता टेकाम व उपाध्यक्ष शरद जोगी यांनी माणिकगड (ultratech) सिमेंट कंपनी मुळे बाधितांची संख्या वाढत असून सगळ्यात पूर्वी माणिकगड सिमेंट कंपनी बंद करण्यात यावी, याविषयीचे व्हिडिओ व्हायरल केले होते, अवघ्या काही दिवसांमध्ये गडचांदूर मध्ये कोरोना बाधितांची घातक संख्या बाहेर आली, आजच्या स्थितीत गडचांदूर मध्ये 22 बाधित समोर येत आहे, आणि न.प. चे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी गडचांदुर बंद राहील व माणिकगड सिमेंट कंपनी सुरू राहील, असा आदेश फर्मावला. काल पावेतो सिमेंट कंपनीमुळे बाधितांची संख्या वाढत आहे, असा msg. देणारे गडचांदूर न.प. चे अध्यक्ष (काॅंग्रेस) सौ. सविता टेकाम व उपाध्यक्ष (रा.कॉं) चे उपाध्यक्ष शरद जोगी यांना असा कोणता दैवी साक्षात्कार झाला की त्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी ला बंद न करता फक्त गडचांदूर शहर बंद व्हावा असे फर्मान सोडले. "कुठेतरी खिचडी शिजली" या शंकांना आत्ता गडचांदूर मध्ये पेव फुटला आहे. यासंबंधात गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध होऊ शकला नाही.
यासंबंधात न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी गडचांदूर सिमेंट कंपनी बंद करणे म्हणजे रोजगारावर लाथ मारणे आहे म्हणून हा निर्णय तूर्त मागे घेण्यात आले असून गडचांदूर शहरामध्ये दोन दिवसासाठी जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरविण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली.


गडचांदूर न.प. चे माजी उपाध्यक्ष सचिन भोयर यांच्याशी बातचित दरम्यान त्यांनी कर्फ्यु लावण्याच्या किंवा बंद करण्याचा अधिकार हा फक्त प्रशासनाला आहे. प्रशासनाने असा कोणताही आदेश काढलेला नसल्यामुळे याठिकाणी राजकारण केल्या जात आहे व गडचांदूरकरांची कोरोना च्या नावावर पिळवणुक केल्या जात असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अरूण डोहे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंद पाळला जातो परंतु पुकारलेला बंद प्रशासनाच्या आदेशाने होत नसुन शासनाच्या आदेशाची सर्रास अवहेलना गडचांदूरमध्ये होत आहे. राजकारणाची पोळी गडचांदूर मध्ये शिजविल्या जात असून शहरांमध्ये बाधितांची वाढलेली संख्या ही गडचांदूर न.प. प्रशासनाच्या हलगर्जीपणा व लापरवाही मुळे वाढली आहे. त्याबाबत यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांच्या नावाने पत्रही दिले आहे व उदाहरणांसह त्याठिकाणी नमूद केले आहे. गडचांदूर मध्ये वाढलेले रुग्ण ही न.प. प्रशासनाची लापरवाही आहे, त्याची चौकशी करण्यात यावी व आत्ता पुकारलेला बंद हा राजकीय स्टंट असून माणिकगड सिमेंट कंपनीला देण्यात आलेली सुविधा म्हणजे "खिचडी शिजली" हे पक्के आहे, असे स्पष्ट मत अरुण डोहे यांनी यावेळी व्यक्त केले. आज 26 जुलै रोजी गडचांदूर नगरपरिषद मध्ये "बंद" विषयी व्यापार्‍यांची सभा घेण्यात आली पण यामध्ये विरोधी पक्षांना डावलण्यात आले, सगळ्यांचेच विचार याबाबत घ्यायला हवे, ही मात्र बेबंदशाही आहे, असे मत भाजपचे नगरसेवक अरूण डोहे यांनी यावेळी व्यक्त केले.


आत्ता गडचांदूर मध्ये बंद ची आवश्यकता नाही, या बंदमुळे बाधितांच्या संख्येमध्ये कमतरता येणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे रोहित शिंगाडे यांनी यावेळी दिली.

माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत असणारे मजूर कर्मचारी हे यांचा गडचांदूर मध्ये वावर असतो. परराज्यामधून आलेले मजुर माणिकगड सिमेंट कंपनीत आहे. सिमेंटचे उत्पादन आजही सुरु आहे, मग याठिकाणी गडचांदूर बंद होत असेल तर माणिकगड सिमेंट कंपनी बंद कां नाही? हा कळीच्या मुद्दा याठिकाणी भाजपचे रोहन काकडे यांनी उपस्थित केला? माणिकगड सिमेंट कंपनी सुरू राहात असेल तर आणि असा काही मौखिक करार झाला असेल तर त्याच्या लाभ गडचांदूरकरांना होणार आहे आहे कां? नाही ? हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. गडचांदुर बंद मग माणिकगड सिमेंट कंपनी कशी काय सूरू? सिमेंट कंपनीसोबत चा अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या घुम जाव हा मात्र चिंतनाचा विषय आहे असा आरोप भाजपचे रोहन काकडे यांनी यावेळी उपस्थित केला.


मागील काही दिवसांपूर्वी गडचांदुर न.प. चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी माणिकगड सिमेंट कंपनी बंद करण्यात यावी असे आवाहन करणारे व्हिडिओ व्हायरल केले होते. आज मात्र "गडचांदुर बंद आणि माणिकगड सिमेंट कंपनी" सुरु अशी भूमिका ते घेत आहे, ही बाब गडचांदुरकर समजणार नाही अशी नाही. गडचांदुर चे नागरिक सुज्ञ आहेत. त्यांना या व्यवहारात "कुणाचा फायदा व कुणाचे नुकसान" होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, असं परखड मत गडचांदूर चे सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ वैरागडे यांनी व्यक्त केले.

दुतोंडी भूमिका असणारे नगराला अध्यक्ष व उपाध्यक्ष लाभले आहेत. जेंव्हा बाधितांची संख्या अत्यल्प होती, त्यावेळी सिमेंट कंपनी बंद करा असे आवाहन केले जाते आणि आज धोकादायक स्थितीमध्ये संख्या वाढल्यानंतर मात्र सिमेंट कंपनी सुरू आणि गडचांदूर शहर बंद अशी भूमिका घेणारे हे नगराला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून लाभले आहेत, हे गडचांदुरकरांचे मोठे दुर्भाग्य आहे. जनतेनी शहराचा विकास व्हावा यासाठी या लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. आज भयावह स्थितीमध्ये या लोकप्रतिनिधींची दुतोंडी भूमिका शहरासाठी घातक आहे, असे ज्वलनशिल मत गडचांदुर शहर मनसेचे लिंगु महाराज कंठाळे यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments