आज नव्या ५ बाधितांची भर, चंद्रपूरमधील ४ तर गडचांदूर १ !



  • आतापर्यत ५७ कोरोनातून बरे, ६१ बाधितांवर उपचार सुरू!
  • चंद्रपूर बाधितांची संख्या ११८ वर !
  • रय्यतवारी कालनी मध्ये एकाच कुटुंबातील दोन
  • उर्जानगर मध्ये एक
  • हिन्दुस्थान लालपेठ कालनी परिसरात एक
  • गडचादूर मध्ये एक
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी आणखी ५ बाधितांची यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ११८ झाली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या ५७ आहे.तर सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ६१ झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरातील एकाच कुटुंबातील एक ४७ वर्षीय महिला व १९ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगाना राज्यातून हे दोन्ही कुटुंब सदस्य परत आले होते. २६ जून पासून गृह अलगीकरणात होते. काल घेण्यात आलेला त्यांचा स्वॅब आज पॉझिटिव्ह आला आहे. ऊर्जानगर मधील काल पॉझिटिव्ह आलेल्या बाधित याच्या संपर्कातील 47 वर्षीय महिला देखील आज पॉझिटिव म्हणून पुढे आली आहे. नाशिक येथून हे कुटुंब परत आले होते.
चंद्रपूर शहरातीलच हिंदुस्तान लालपेठ कॉलनी येथील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे शहरातून २४ जूनला ते चंद्रपूर मध्ये आले होते. तेव्हापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह ठरला आहे. तर गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील ४८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. आसाम राज्यातून २९ जून रोजी परतल्यानंतर सदर व्यक्ती गृह अलगीकरणात होता.त्यांचा काल स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह संख्या ११७ झाली आहे.

  जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) आणि ३ जुलै ( ११ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ११८  झाले आहेत. आतापर्यत ५७ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ११८  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ६१ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या