कोरोनाबद्दल DIO ची मार्गदर्शक short फिल्म !



  • शासनाच्या निर्देशांकडे जिल्हावासियांचा कानाडोळा !
  • सोबतची short film अवश्य बघा व निर्देशांचे पालन करा!

सध्या जिल्ह्यामध्ये कॉरेन्टाइन होण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक बाधित पुढे येत आहे. या विषयावर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कुणालजी खेमणार व जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने (Dio) एक शॉर्ट फिल्म बनविली व अत्यंत मार्गदर्शक असलेली ही शॉर्ट फिल्म अवश्य बघावी. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य पोहोचवावी.

जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, शासकीय निर्देशांचे पालन काटेकोरपणे होत नसल्यामुळे बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात भर पडत आहे. सार्वजनिक ठिकाणी जातांना तोंडाला माॅस्क असणे गरजेचे आहे, जास्तीत जास्त वेळा हात स्वच्छ धुणे, आवश्यकता असेल त्याच वेळेस बाहेर निघण्याच्या सूचना वारंवार शासनाकडून, प्रशासनाकडून देण्यात येत आहे परंतु जिल्ह्यात या सूचनांचे योग्य पालन होत नसल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातून, बाहेर राज्यातून येणाऱ्यांनी यासंबंधीची माहीती प्रशासनाला, संबंधित विभागाला कळविणे आवश्यक आहे. कोरोनटाईन, होम कोरोनटाईन चे नियम, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना पाळावयाच्या नियमांचे उल्लंघन केल्या जात असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंड ही ठोठावण्यात येत आहे. नियमांचे पालन न करणे म्हणजे आपल्यासोबत दुसऱ्यांनाही आणखी जास्त धोका वाढवणे आहे परंतु ही बाब सामान्यजणांकडून तेवढी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे आज जिल्ह्यात चित्र आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजच्या घडीला बाधितांची संख्या 118 आहे, ती ज्या सपाट्याने वाढत आहे, त्याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा. शासकीय निर्देशांचे पालन दुसऱ्यांसाठी नाही तर आपण स्वत:साठी करीत आहे, एवढेही ध्यानात ठेवले तरी आपण स्वत:सोबत आपल्या कुटूंब व शेजाऱ्यांची ही सूरक्षा करू शकतो. घराच्या शेजारी रूग्ण आढळला तर निर्देशित भाग प्रतिबंधित (containment zone) केला जातो. अशावेळी होणारा त्रास, मानसिक ताण होऊ नये असे वाटत असल्यास प्रत्येकांनी शासकीय निर्देशांचे पालन करायला हवे व आपले मित्र, साथिदार, शेजारी यांना यासाठी आग्रह धरायला हवा. आलेले संकट मोठे आहे, ते टळणार नक्कीच आहे, फक्त त्यासाठी आपण तयार हवे आणि आपल्या साथिदारांना ही त्यासाठी तयार करायचे आहे, एवढीच याक्षणी तरी साऱ्यांची जबाबदारी आहे.

(यासोबत असलेली चित्रफित अवश्य बघावी, सोबतचं आपले कुटूंब, मित्रमंडळी यांना ही ती शेअर करावी, ही यानिमीत्त आग्रहाची विनंती!)

Post a Comment

0 Comments