माणिकगड सिमेंट कंपनी काही दिवसांसाठी बंद करा!  • गडचांदूर न.प. अध्यक्ष सौ. टेकाम व उपाध्यक्ष शरद जोगी यांची मागणी!

गडचांदूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर मधील माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये मिळालेल्या रूग्णानंतर ही सिमेंट उत्पादन करणारी कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात यावी असे आवाहनचं गडचांदुर नगर परिषद अध्यक्ष सौ. सविता टेकाम व न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी एका video द्वारे केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिवसेंदिवस जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शुक्रवार दि. 17 रोजी जिल्ह्यात दहा बाधितांची वाढ झाल्यानंतर 228 वर ही संख्या पोहोचली आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदुर हे औद्योगिक शहर म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. जुने माणिकगड सिमेंट आता अल्ट्राटेक म्हणून नावारूपास आले आहे. या सिमेंट कंपनीत कार्यरत असलेले, वसाहत करणारे बाधित मिळाले असल्यामुळे या कंपनीचे उत्पादन काही दिवस थांबविण्यात यावे, अशी मागणी गडचांदूर न.प. च्या अध्यक्षा सौ. सविता टेकाम व उपाध्यक्ष शरद जोगी यांनी केली आहे.
माणिकगड सिमेंट कंपनीचे स्वत:चे कोरोनटाईन सेंटर आहे, पण ते फक्त कागदोपत्री असून त्याठिकाणी शासकीय नियमांचे पालनचं केलेल्या जात नाही. माणिकगड सिमेंट कंपनीमधील कामगार वर्गाचा सरळ संबंध हा गडचांदूरच्या नागरिकांसोबत येत असल्यामुळे ही कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात येऊन कामगारांचा पगार शासन नियमाप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणीही गडचा़दूर चे रहिवासी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments