पब्लिक पंचनामा च्या बातमी चा impact!  • अखेर मुल च्या राईस मिल मालकांवर गुन्हा दाखल !

चंद्रपूर (वि.प्र.)
मुल येथील राईस मिल मालकांनी कायद्याचे उल्लंघन केले, त्यामुळे मुल शहरात कोरोना बाधितांची संख्येत वाढ कशी झाली, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी विजय सिद्धावार संपादित साप्ताहिक पब्लिक पंचनामा च्या न्युज पोर्टलवर❗ *भय इथले संपत नाही*‼️ *मूलमध्ये आणखी ५ संक्रमीत- राईस मील मालकासह ट्रॅव्हल्स मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी*
या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत आज मूल चे उपविभागीय अधिकारी यांनी दोषी असलेल्या मुल येथील साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईस मिलच्या व्यवस्थापकांनी मिलमध्ये काम करण्यासाठी बिहार राज्यातुन काही मजुर आणले होते, नियमानुसार त्यांना आणल्यापासून 14 दिवसापर्यंत गृह विलगीकरणात ठेवणे व त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक होते. आणि त्यासंबंधी राईस मिल चालकांना सुचीत करण्यात आले होते परंतु सदर मजुरांनी गृह विलगीकरणाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने सदर राईस मिल मालकाच्या विरुध्द भा.द.वि. 188, 269, 270 अन्वये दिनांक 25/07/2020 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.
कोरोनाच्या भयावह स्थितीमध्ये लागलेली संचारबंदी या काळात आपले कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धा, सोबतचं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले वर्तमान पत्र व न्युज पोर्टल चे पत्रकार यांनी मैदानी स्तरावर घडणाऱ्या घटनांना प्रशासनासमोर आणण्याचा प्रयत्न आपल्या वृत्ताच्या माध्यमातून वेळोवेळी केला आहे. मुल येथील राईस मिल मध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास जात असल्या संदर्भात पब्लिक पंचनामा ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत दोषी राईस मिल मालकांवर गुन्हे दाखल केले आहे. ही न्युज पोर्टल संपादकांची उपलब्धी आहे.

Post a Comment

0 Comments