चंद्रपूर दि ५ जुलै : महाराष्ट्र राज्याचे नगर विकास, ऊर्जा ,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उद्या दिनांक 6 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत. कोरोना आजारा संदर्भातील जिल्हाभरातील यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असून सकाळी ८ वाजता वीज ग्राहकांची देखील चर्चा करणार आहेत.
प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. ५ जुलै रात्री उशिरा त्यांचे चंद्रपूर शहरात आगमन होणार असून ते ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृहावर मुक्कामी असतील.
सोमवारी सकाळी 8 वाजता चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चांदा क्लब जवळ विश्रामगृहावर विज बिल संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांची ते चर्चा करणार आहेत. यावेळी ते विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याशी या वषींच्या परीक्षा विषयासंदर्भातही चर्चा करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष कैलासवासी महेंद्र लोखंडे यांच्या घरी ते सांत्वना भेटीसाठी जाणार आहेत. त्यानंतर नऊ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह येथे भेट देणार आहेत. दुपारी १२ वाजता बाबुपेठ येथील कैलासवासी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारकास ते भेट देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता आंबेडकर नगर वार्ड चंद्रपूर येथे भेट. दुपारी २ वाजता महानगरपालिका चंद्रपूर कोरोना संदर्भातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत. दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून महानगरपालिका सभागृहांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांची ते वार्तालाप करणार आहेत.
दुपारी साडेतीन वाजता नंतर ते बल्लारपूर कडे प्रयाण करतील. ४ वाजता बल्लारपूर विश्रामगृहावर ते कार्यकर्त्यांशी भेटी घेणार आहे. सायंकाळी ५ .३० वाजता गडचांदूर येथे आगमन व नगरपालिका सभागृह गडचांदूर येथे कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. रात्री हिराई विश्रामगृह चंद्रपूर येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
0 Comments