फी साठी माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिकेविरोधात पालकांचा आक्रोश!



चालु वर्षाचे चार महिन्यांचे फि भरा अन्यथा टिसी मिळणार नाही,या मुख्याध्यापिका यांच्या पालकांना केलेल्या आव्हाना नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पालकांची मागणी,

गडचांदुर : शासनाच्या निर्देशाला पायदळी तुडवुण आपल्या मनमर्जिने हवी ती फी वाढ करणाऱ्या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आता लॉक डाऊन च्या काळात बेकायदेशीर ऑनलाईन क्लासेस च्या नावावर मुलांच्या पालकांकडून चार महिन्याची फी घेत असल्याने अशा शाळा चालकावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले असले तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांनी पालकांकडून चार महिन्याची फी वसूल करण्याचा चंग बांधला असून गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ह्या सुद्धा बळजबरी पालकांकडून चार महिन्याची फी वसूल करीत आहे. एवढेच नव्हे तर जर चार महिन्याची फी भरली नाही तर विद्यार्थ्यांची टी सी मिळणार नसल्याचा इशारा सुद्धा त्या पालकांना देत आहे त्यामुळे स्वतः बेकायदेशीर ऑनलाईन वर्ग चालविणाऱ्या व विद्यार्थ्यांकडून जबरन फी वसूल करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्या विरोधात पालक वर्ग आक्रमक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आता पालकांकडून होताना दिसत आहे.

या शाळेची आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची चार महिन्याची 8810 रुपये आहे व इतर वर्गाची कमीजास्त प्रमाणात जवळपास 8 ते 10 हजार पर्यंत आहे ते फी चे पैसे भरा आणि टिसी घेवून जा अशा भाषेत मुख्याध्यापिका अर्चना गोलछा ह्या बोलतात त्यामुळे आता लॉक डाऊन च्या काळात सगळ्यांचे रोजगार गेले व सगळे कामकाज बंद असताना बेकायदेशीर चालणाऱ्या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणाची फी द्यायची कशी ? हा मोठा प्रश्न असून आता पालकांनी सुद्धा या मुख्याध्यापिका यांच्या विरोधात मोहीम उघडून शाळा संचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे दिल्याची माहिती आहे.
एकीकडे माणिकगड सिमेंट कंपनीने कोराणाच्या लॉक डाऊन दरम्यानचे चार महिने कामगारांचे वेतन दिले नाही आणि त्याच व्यवस्थापनाची शाळा चार महिने शाळा बंद असुन सुद्धा चार महिन्यांची फिस भरा नाही तर मुलांना समोर परिक्षा देता येणार नाही असे बोलतात तर मग सर्वसामान्यांना न्याय देणार कोण ? असा प्रश्न निर्माण होत आहे मात्र आता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पालकांची तक्रार गेल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका गौलच्छा यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे

Post a Comment

0 Comments