अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी भ्रष्ट वनाधिकारी व कर्मचारी "गदगदले"!



चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागातील ज्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे तपासात आहेत, चौकशीचा अंतिम स्तरावर आहे. तसेच शेवटच्या घटका मोजणाऱ्या भ्रष्ट वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांच्या या बदल्यामुळे बऱ्यापैकी भावल्याचे दिसत असून ते भ्रष्ट मात्र अधिकार्‍यांच्या बदल्यामुळे चांगलेच "गदगदले" आहेत. नवा अधिकारी येणे म्हणजे तपासाला नवी "दिशा (?)" मिळणे असे गृहीत धरून अनेकांनी आपली नवी "आखणी" सुरू केली आहे. आता कोण कुठे हे स्पष्ट झाल्यानंतर "भ्रष्टां"नी कोणाच्या जवळचे कोण यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. वनविभागातील भ्रष्टाचाराची "जडे" उपटून काढण्यात वनाधिकाऱ्यांनी अवश्य पुढाकार घ्यावा, अशीच यानिमीत्ताने अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील वनविभागात मोठे फेरबदल !
चंद्रपूर : भारतीय वनसेवा (आयएफएस) मधील बदलीद्वारे होणाऱ्या ५३ पदस्थापनेचे सोमवारी आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. चंद्रपूर वनवृत्त मुख्यवनसंरक्षक एस. रामाराव यांची यवतमाळ येथे त्याच पदावर बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ठाणे येथील उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर हे ताडोबाचे अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे नवे क्षेत्र संचालक म्हणून आले आहेत.
राज्यातील 5 डीएफओ व 119 आरएफओ च्या बदल्या !
राज्याच्या वनविभागात बदल्यांच्या सपाटा सुरू झाला आहे. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही, तोच विभागीय वन अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली आहे. यात पाच उपवनसंरक्षक व ११९ आरएफओ चा समावेश आहे. आरएफओ च्या बदलीसाठी 140 जणांची यादी तयार करण्यात आली होती. 40 आरएफओ अद्याप ही बदलीच्या प्रतिक्षेत आहे.

Post a Comment

0 Comments