Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

आरोग्य सभापतीच्याच प्रभागात स्वच्छतेचा अभाव !! #gadchandur n.p.  • मंगळवार दि. 25 ला निषेध आंदोलन !
  • भाजपाचे नगरसेवक डोहे, मोरे करणार जाहीर निषेध !!

गडचांदूर - गडचांदूर शहराला सन २०१४ ला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० ला पार पडली व थेट नगराध्यक्षा म्हणून सौ. सविताताई टेकाम ह्या निवडून आल्या तर कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस युतीत शरद जोगी उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले. आज सात आठ महिने सत्तेत बसून शहराच्या विविध विकास काम तर सोडा साधे स्वच्छतेचे काम सुद्धा यांचे काळात योग्य रीतीने होत नसल्याचे बोलले जात आहे. प्रभाग दोन हा आरोग्य सभापतीचा वार्ड असताना या ठिकाणी मागील चार पाच महिन्या पासून नाली साफ करणाऱ्याचे व फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दर्शन नाही.वारंवार मोरे-डोहे नगरसेवक यांनी लेखी व तोंडी अनेकदा माहिती देऊनही त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे नेतृत्वात जनतेच्या सहभागातून येत्या २४ तारखेपर्यंत प्रभाग क्र. एक व दोन मध्ये नालीची साफसफाई व फवारणी आणि घंटागाडी नियमित चालू न केल्यास २५ तारखे ला प्रभाग क्र एक व दोन मधील ठिकठिकाणी समाईक अंतर राखून शासनाचे नियमाचे पालन करून काळे झेंडे,फलक,व काळ्या पट्या लावून नगर परिषद शासन प्रशासनाचा जाहीर निषेध करणार असल्याचे लेखी पत्र मा नगराधक्ष्य,मुख्याधिकारी याना दिले असून यावर न प काय निर्णय घेतील याकडे गडचांदूर वासींचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments