Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

अविनाश ढेंगळे यांचेसह अनेकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश !
  • मोरेश्वर टेमुर्डे यांच्या जन्मदिनामीत्त आयोजित कार्यक्रमात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश !
  • जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पुष्पगुच्छ देवून केले स्वागत !

चंद्रपूर : माजी पंचायत समिती सदस्य तथा वरोराचे माजी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.अविनाश ढेंगळे,यांनी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत तसेच अनेक युवकांनी त्यात प्रामुख्याने श्री.मुजम्मिल शेख, जुबेर शेख, दानिश शेख, ऋतिक आत्राम, दानिश कुरेशी, शहाबाज अन्सारी, जुनेद पठाण यांचेसह अनेक युवकांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्र्वरराव टेमुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे,राष्ट्रवादी VJNT सेल चा विदर्भ अध्यक्ष सौ.रंजना पारशिवे, तालुका अध्यक्ष विशाल पारखी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

Post a Comment

0 Comments