Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

ज्‍या कामांना मी सुरूवात केली ती पूर्ण करणारचं- आ. मुनगंटीवार!
  • आ. मुनगंटीवार यांनी टाटा ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यांसह बैठक घेत कॅन्‍सर हॉस्‍पीटलचा घेतला आढावा!

चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने जे महत्‍वपूर्ण निर्णय मी घेतले, ज्‍या विकासकामांना माझ्या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात सुरूवात केली ती मी पूर्ण करणारच असा विश्‍वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.
दिनांक 27 ऑगस्‍ट रोजी चंद्रपूर येथे टाटा ट्रस्‍टच्‍या सहका-र्याने मंजूर कॅन्‍सर हॉस्‍पीटल संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज टाटा ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यांसह ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला टाटा ट्रस्‍टचे डॉ. कैलाश शर्मा, जितेंद्र तिवारी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. आ. मुनगंटीवार यांनी या बैठकीत कॅन्‍सर हॉस्‍पीटलच्‍या प्रगतीबद्दल आढावा घेतला. इमारत बांधकाम , डॉक्टर्स व नर्सेस यांची निवड व प्रशिक्षण , केंद्र सरकारकडून घ्यावयाच्या परवानगी यावर विस्तृत चर्चा झाली. मे 2021 पर्यंत बांधकाम पूर्ण करून ऑगस्ट 2021 मध्ये ह्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. येत्या जानेवारी महिन्यापासून डॉक्टर्स व नर्सेसच्या प्रशिक्षणाची तयारी सुरू करावी अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. टाटा ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यांनी याबाबत सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.
तत्‍कालीन अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय परिसरात राज्‍य शासनाचा वैद्यकिय शिक्षण विभाग, जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर आणि टाटा ट्रस्‍ट यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने दिनांक 5 जून 2018 रोजी घेतला. यासंबंधीचा शासन निर्णय दिनांक 26 जून 2018 रोजी वैद्यकिय शिक्षण विभागाने निर्गमित केला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधी टाटा ट्रस्‍टकडे प्रभावी पाठपुरावा केला, अनेक बैठकी घेतल्‍या. टाटा ट्रस्‍टने दिलेल्‍या होकारानंतर तत्‍कालीन सरकारने चंद्रपूर येथे 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा निर्णय घेतला. जिल्‍हयातील कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना सर्वंकष व अत्‍याधुनिक कर्करोग उपचाराच्‍या सोईसुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी राज्‍य शासनासह कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्‍ये अग्रगण्‍य व नामांकित असलेल्‍या टाटा ट्रस्‍ट तसेच जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान यांच्‍या माध्‍यमातुन हे रूग्‍णालय उभारण्‍यात येत आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर जिल्‍हयात विकासकामांची दिर्घ मालिका तयार केली. चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर अत्‍याधुनिक सैनिकी शाळा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, अत्‍याधुनिक वनअकादमी, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय, क्रिडा संकुलांचे निर्माण, अभ्‍यासीका, पोंभुर्णा येथे टूथपिक उत्‍पादन प्रकल्‍प, अगरबत्‍ती उत्‍पादन प्रकल्‍प, बांबू हॅन्‍डीक्रॉ्फ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाचा विकास, नाटयगृहांची बांधकामे, बस स्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरण, विश्रामगृहांची बांधकामे, चिचडोह सिंचन प्रकल्‍प, पळसगांव-आमडी उपसा जलसिंचन योजना, चिचाळा व लगतच्‍या गावांमध्‍ये सिंचन सुविधा, मौलझरी प्रकल्‍प, नलेश्‍वर, शिवणी चोर सिंचन प्रकल्‍प असे विविध सिंचन प्रकल्‍प, डायमंड कटींग सेंटर, जे.के. ट्रस्‍टच्‍या वतीने दूध उत्‍पादनाला चालना, इको पार्क, श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराचा विकास, ज्‍युबिली हायस्‍कुलचे नूतनीकरण, वीर बाबूराव शेडमाके स्‍टेडियम अशी अनेक महत्‍वपूर्ण विकासकामे जिल्‍हयात मंजूर करत या जिल्‍हयाच्‍या विकासाला गती दिली. यातील अनेक विकासकामे पूर्णत्‍वास आली असून काही प्रगतीपथावर आहे.
चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्‍यांच्‍या प्रेमाची परतफेड मी कधिही करू शकणार नाही. मात्र चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांची सेवा मी आजन्‍म करेन. सैनिक शाळा, वनअकादमी, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र, बॉटनिकल गार्डन, बाबुपेठ रेल्‍वे ओव्‍हर ब्रिज, बल्‍लारपूर क्रिडा संकुल, अभियांत्रिकी महाविद्यालय वसतीगृह, दाताळा येथील पुल या विकासकामांसाठी येत्‍या पुरवणी मागण्‍यांद्वारे आवश्‍यक निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी मी प्रयत्‍नशील असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Post a Comment

0 Comments