कोटी नेऊन ठेवला गां माह्या "चंद्रपूर जिला" !



1 खासदार व 6 आमदारांचा जिल्हा !
आज दि. 15 सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेने पाठवलेल्या माहितीनुसार बाधित रुग्णांची संख्या 251 तर मृतांची संख्या 6 आहे, तत्पूर्वी सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता आरोग्य विभागाच्या आलेल्या अधिकृत माहितीनुसार चंद्रपुरात 200 बाधित व 7 मृत्यू जिल्ह्यात झालेले होते. मृतकांची आत्तापावेतोची सगळ्यात मोठी आकडेवारी ही या दोन दिवसांत समोर आली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीस हजाराच्या जवळपास बाधित रुग्ण मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे तसेच जाहीर ही करण्यात आले आहे. कोरोना ही जागतिक महामारी आहे. भारतातील महाराष्ट्रामध्ये या आजाराच्या मोठा प्रकोप झाला परंतु यापासून चंद्रपूर जिल्हा किती तरी दिवस सुरक्षीत होता ? आज चंद्रपूर जिल्ह्याची अवस्था फार वाईट आहे. तीन आकड्यांमध्ये बाधितांची संख्या मिळत आहे व धक्कादायक म्हणजे मृतकांची वाढत असलेली संख्या ही जिल्ह्यासाठी घातक आहे. नागरिकांची "कोरोना" या आजारावर मात करण्याची मानसिकता आहे, परंतु "कैविड सेंटर" मध्ये दररोज होत असलेले मृत्यू व मृतकांच्या नातेवाईकांमध्ये त्याबद्दल असलेला असंतोष दूर करण्यात आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व शासन अपयशी ठरत असल्याचे आजचे चित्र आहे. चाचणी झाली तर "पॉझिटिव्हचं निघू" हा लोकांमध्ये पसरलेला भ्रम दूर करण्यात आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व स्वत: पालकमंत्री हे अपयशी ठरले आहे, ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.

जिल्ह्यात कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खाजगी रुग्णालये खुली करण्यात आली आहे असे सांगण्यात येत असले तरी खाजगी रूग्णालयाचे डॉक्टर चंद्रपूरात पॉझिटिव मिळाले आहे. जिल्ह्यातील शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांचा मृत्यूच होतो, ही धारणा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यावर कोणताही तोडगा किंवा स्पष्टीकरण जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून अद्यापावेतो देण्यात आले नाही. नागरिकांनी स्वतःहून चाचणी करावी असे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते, परंतु नागरीक चाचणी करण्यास समोर येत नाही हे आरोग्य विभागाचे मोठे अपयश आहे. जिल्हावासी यांच्या मनातील कोरोणाची बद्दलची भीती काढण्यात जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन हे अपयशी ठरले आहेत. रोज नवनवीन घोषणा केल्या जातात यामुळे नागरिकही कंटाळले आहेत. आता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत जगायचे आहे ही मानसिकता जिल्हावावासियांची झाली आहे म्हणूनच मराठी भाषेमध्ये आज जिल्हावासी "कोटी नेऊन ठेवला गां माह्या "चंद्रपूर जिला" !" असे म्हणून आहे.

1 खासदार व 6 आमदारांचा जिल्हा !

बाळू धानोरकर च्या रुपाने कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार व सहा विधानसभेचे सहा आमदार असलेला हा चंद्रपूर जिल्हा आहे. त्यामध्ये विजय वडेट्टीवार यांचे कडे महाराष्ट्राचे मंत्री पद आहे व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतेकांपाशी खासदार व आपापल्या क्षेत्रातील आमदारांचे फोन नंबर आहेत परंतु जनतेचे प्रतिनिधी आजच्या भयावह स्थितीमध्ये त्यांच्या मतदारांना दिलासा देण्यासाठी किती सामोरे आले आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. आमचे नेते आमचा फोनच उचलत नाही, या तक्रारी आज मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नातेवाईकांना आपला रुग्ण बरा व्हावा यासाठी जनप्रतिनिधी यांच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे परंतु साधा दिलासा देण्यासाठी ही फोन न उचलणे ही बाब जिल्ह्यात चुकीची घडत आहे. चंद्रपूरचे खासदार दिल्लीला आहेत, चंद्रपूरच्या आमदार जोरगेवार हे बाधित आहे व नुकतेचं ते जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत. चंद्रपुरात मुक्कामी असलेले मुनगंटीवार हे मुल-बल्लारपूरचे आमदार आहेत. त्यांना चंद्रपुरात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असा संदेश अप्रत्यक्षरीत्या हिटलर प्रवृतीच्या सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना देऊन ठेवलेला आहे. आजच्या परिस्थितीत कोविड चे मुख्यालय असलेले चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हे असुरक्षित आहे. चंद्रपूरातील कोविड रुग्णालय म्हणजे मृत्यूचे द्वार आहे असा समज (गैर) मोठ्या प्रमाणात पसरला आहे. लोकप्रतिनिधी आमचे ऐकत नाही आणि डॉक्टर आम्हाला समजत नाही अशी स्थिती आज जिल्ह्यामध्ये झालेली आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतक मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे परंतु जनप्रतिनिधी यावर उपाय योजना काढण्यात अपयशी ठरले आहे व प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सामंजस्याचा अभाव आहे, यातून चंद्रपूरची जनता पार भरकटली आहे. आज खालावलेल्या मानसिकतेमध्ये जनता जीवन जगून राहिली आहे. रोजगार अर्धवट हिरावला गेला आहे व बेरोजगारी सामान्यजनासमोर आवासून उभी आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी हेवेदावे विसरून सामंजस्याने जिल्हावासीयांना मार्ग दाखवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून होत आहे. जिल्हावासी द्विधा मनस्थितीत असून लोक प्रदीप प्रतिनिधींविषयी कमालीची नाराजी आज जनतेमध्ये स्पष्ट दिसत आहे. आरोग्य विभाग आपल्या तोऱ्यात असून एप्रिल मार्चपूर्वी ज्या डॉक्टरांना भारतामध्ये देव मानला जात होतो त्या डॉक्टरांची प्रतिभाच पूर्णतः बदलली आहे. जिल्हा वासियांना "कोटी नेऊन ठेवला गां माह्या "चंद्रपूर जिला" !" हे म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय आज उरलेला नाही.


Post a Comment

1 Comments

  1. बर झालं भाजप महाराष्ट्रात सत्तेत नाही आहे, नाहीतर सुधीर च्या बॅनर बाजीमुळे च पूर्ण जिल्हा वासीय जनताच कोरोनामय झाली असती

    ReplyDelete