गडचांदूरात जनता कर्फ्यु ला पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद !  1. गुरुवार पासुन चार दिवसांचा जनता कर्फ्यु !
  2. गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने घेतला पुढाकार !

गड़चांदूर : गडचांदूर येथे गुरूवार दि. 17 पासून चार दिवसांचा जनता कृती पाळण्याचे आवाहन गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने केले होते. गुरुवार दिनांक 17 रोजी पहिल्या दिवशी जनता कर्फ्यू ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले दुकाने बंद ठेवून या बंद ला प्रतिसाद दिला. चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे. त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे. गडचांदूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन प्रतिष्ठीत व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे. त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साखळी तोडणे गरजेचे आहे. हा उद्देशडोळ्या समोर ठेवून गडचांदूर शहरातील गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने गडचांदूर शहरात गुरुवार दि. 17 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने 'जनता कर्फ्यू' पाळण्याचा निर्णय घेतला होता.

Post a Comment

0 Comments