शासकीय रूग्णालयात कोरोनाचा उपचार घ्या आणि लोकप्रतिनिधींनो मिळवा 50 हजार !



  • समाजसेविका शाहिद काजी यांचे वास्तवदर्शन करणारे फलक !
  • शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन साहस करण्याचे खुले आवाहन !

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना स्थिती उद्वल्यानंतर ही शासकीय रूग्णालयात उपचार करण्यास सामान्य माणूस आज घेत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचे जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गांधी चौकात शाहिद काजी या समाजसेविकेने एक बॅनर छळकवले आहे. या बॅनर वर त्यांनी खासदार, आमदार, मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी शासकीय रुग्णालयात उपचार करून साहसी कार्य करावे, असेच करणाऱ्यांना 50 हजार रुपयाची रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची चक्क इनामी घोषणा जाहिर केली आहे. या बॅनरची आज जिल्ह्यामध्ये चर्चा होऊन राहिली आहे. यासोबतच जर आपल्याला चंद्रपूर जिल्हावासियांसोबत सहानुभूती असेल तर कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे खुले आव्हान या बॅनरवर करण्यात आले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सामान्यांवर योग्य उपचार होत नाही, रुग्णाला भरती करण्यासाठी बेड नाही, ऑक्सीजन नाही, प्रत्येकाला कोरोना पॉझिटिव्ह चं दाखविल्या जाते, बाधित रूग्णांवर उपचार न करता त्यांना मृत्यूच्या खाईत ढकलले जाते अशा विविध अफवांना पेव फुटला आहे. या अफवांमुळे सामान्य जनता हवालदिल झाली असून चाचणी करण्यासाठी कुणीही स्वतःहून समोर येत नाही आहे, त्यामुळे जिल्ह्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे नाकारता येत नाही. जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांची चाचणी झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन केलेले उपचार यामुळे आणखी जास्त संभ्रमाची स्थिती निर्माण झाली, गैरसमज निर्माण झाले ते दूर करण्यात आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, शासन व प्रतिनिधी अपयशी ठरले, त्यामुळेच शहराच्या मुख्य ठिकाणी लावण्यात आलेले हे बोलके बॅनर जिल्ह्यातील वास्तव परिस्थिती दर्शविणारे ठरत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Post a Comment

0 Comments