जिव धोक्यात घालून परिवहन महामंडळाचे वाहक-चालक वेतनाच्या प्रतिक्षेत देत आहेत सेवा !



  • अन्यथा ९ पासून "आत्मक्लेष आमरण उपोषण" !
  • शासन नियमाला जिल्ह्यातील वरिष्ठांची तिलांजली !

शासन नियमाला जिल्ह्यातील वरिष्ठांची तिलांजली !

परिवहन महामंडळाचे वाहक-चालक हे आपला जिव धोक्यात घालून महामंडळाला सेवा देत आहेत. आंतरजिल्हा व जिल्हाबाह्य बस सेवा सुरू केल्यानंतर महामंडळाने वाहक-चालकांसंबंधात काही निर्देश दिले होते. त्यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांची पुर्ण नोंद ठेवण्यात यावी, बस मध्ये चढतांना त्यांना हाथ धुण्यासाठी व्यवस्था आगारात करण्यात यावी, प्रत्येकाने मॉस्क चा वापर करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे वाहक-चालक यांना सॅनिटायझर व मॉस्क पुरविण्यात येतील. बस आगारामधून सुटण्यापूर्वी ती पुर्ण सॅनिटायझर केल्या जाईल असे अनेक निर्देश देवून शंभर टक्के बस सेवा सुरू करण्यात आली परंतु शासनाच्या निर्देशाकडे वरिष्ठांकडून कुर्लक्ष होत असल्याचे चित्र बस आगारात दृष्टीस पडत आहेत. याविरोधात कर्मचाऱ्यांनी काही बोलल्यास त्यांना रजेवर जाण्याचा सल्ला देण्यात येतो. बस आगारामध्ये शासन निर्देशाप्रमाणे सोयी सुविधांचा अभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रत्येक बस थांब्यावरून प्रवाशांना घेण्यात यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. वाहक-चालकांच्या आरोग्याकडे वरिष्ठ अधिकान्यांकडून पुर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असून हलक्या प्रतिचा मास्क त्यांना फक्त एकदाच देण्यात आला असून सॅनिटायझर सुद्धा वाहक-चालकांपैकी एकालाच दिले जाते, ते सुद्धा धोकादयक ठिकाणी बस जात असेल त्यांनाचं पुरविल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वाहक-चालक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची कोविड-१९ तपासणी ही आगारामध्येच व्हायला हवी परंतु तसे न करता त्यांना शासकीय रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला देण्यात येत असल्यामुळे आरोग्याची चिंता परिवहन महामंडळाच्या वाहक-चालकांना सतावत आहे.

चंद्रपूर (का.प्र.)
कोरोना संकटाचा अनेकांना फटका बसला आहे. परिवहन महामंडळ हे यापासून बचावले नाही. मागील दोन महिन्यांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचान्यांना त्यांचे पगार मिळाले नाहीत. आता शंभर टक्के तत्वावर बस फेन्या सुरू झाल्या असून प्रवाशांचा पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला आर्थिक फटका बसत
आहे. परिणामी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे दोन महिन्यांपासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना अद्याप ही मिळाले नाही.त यामुळे ऐन लॉकडाऊनमध्ये कर्मचा-यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोनामुळे आंतरजिल्हा व जिल्हाबाह्य बस फेन्या बंद करण्यात आल्या होत्या. सुमारे सात महिने बसफेऱ्या बंद असल्याने महामंडळाला याचा आर्थिक फटका सहन करावा लागला. प्राथमिक स्तरावर महामंडळाला माल वाहतुक सुरू करावी लागली होती. त्यानंतर ५० टक्के तत्वावर बस सेवा सुरू करण्यात आली, परंतु त्याला प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता शंभर टक्के बस सेवा सुरू करण्यात आली नाही, परंतु प्रवाशांचा प्रतिसाद योग्य तसा मिळत नसल्यामुळे आर्थिक तोटा भरून काढण्यात महामंडळाला आणखी काही अवधी लागेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचान्यांचे वेतन थकीत राहिले होते. सात महिने वाहतुक बंद असल्याने कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात वेतन देण्यात आले. कर्मचान्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला. थकीत असलेले वेतन कर्मचान्यांना मिळाले. मात्र आता जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे पगार अद्याप ही थकीत आहेत. आता सप्टेंबर महिना ही पुर्ण झाला आहे. एकंदर तिन महिन्यांपासून महामंडळाचे कर्मचारी पगाराविना असल्यामुळे त्यांच्या कुटूंबाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कुटूंबाची आर्थिक स्थिती यामुळे कोलमडले असल्याचे चित्र आहे. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी आता कर्मचान्यांकडून होऊ लागली आहे.

अन्यथा ९ पासून 
"आत्मक्लेष आमरण उपोषण" !

राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा.अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.
वेतनाअभावी सर्व कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या ७ तारखेपर्यंत वेतनाबाबत मार्ग काढावा.अन्यथा ९ ऑक्टोबर रोजी राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक आहे. निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकार कडून महामंडळाकडून मदत मागितली आहे. परंतु या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्र्यांसह प्रशासनाशी वेळोवेळी भेट घेऊन निवेदने दिली आहेत. वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आत्मक्लेश आमरण उपोषण केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments