ब्युटी कॉन्टेस्टच्या स्पर्धेत शिल्पा कोंडावार-दिनगलवार विजेत्या !



  • कोलकत्ता येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धा !
  • संपूर्ण देशातून आले होते १५० स्पर्धक !

चंद्रपूर : मिशन ड्रिम्स मिसेस इंडिया २0२0 तर्फे कोलकत्ता येथे आयोजित ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धेमध्ये शिल्पा सुनील कोंडावार या विजेत्या ठरल्या. त्यांचा मिसेस गोजिर्एस आणि विनर दोन उपाधी व दोन क्राऊन देऊन सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेमध्ये सुमारे १५0 स्पर्धकांनी भाग घेतला. यात ३0 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, मणिपूर, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, पं. बंगाल, लुधियाना, जम्मू अशा विविध राज्यातून सह्भाग झाला होता. आणि या स्पर्धेमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव स्पर्धक शिल्पा सुनील कोंडावार यांचा सहभाग होता. हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय गौरवास्पद बाब आहे की, ग्रामीण क्षेत्रातून असूनसुद्धा शहरातील प्रती स्पर्धकांना जिंकण्यात यश आले. जिद्द व चिकाटी असेल तर कोणतीच बाब अशक्य नसते, हे त्यातून कळाले असल्याचे मत त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
यापूर्वी ही एंजल्स अँड डेमॉन्स तसेच इंटरनॅशनल ह्युमन्स राईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात घेण्यात आलेल्या 'मिसेस ग्लॅमर्स २०२०' स्पर्धेत शिल्पाने महाराष्ट्र ग्लॅमर्स बेस्ट अॅटीट्युट व फर्स्ट रनर अप असे दोन प्रथम पुरस्कार पटकाविले होते. शिल्पा ही चंद्रपूर च्या
सुरेश दिनगलवार यांची कन्या आहे. आलापल्ली येथील कोंडावार कुटूंबात त्यांचा विवाह झाला असून विविध क्षेत्रात त्या पुढाकार घेत असतात. त्या उच्च शिक्षीत असून इंग्रजी विषयातून एम.ए., एम.एड., एम.लिब. त्यांनी केले आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांनाच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन ही त्या करतात. सद्यस्थितीत राजुरा येथील महाविद्यालयात त्या शिक्षीका आहेत. आजच्या युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी महिला मंडळाच्या माध्यमातून त्या नेहमी पुढाकार घेत असतात. पद्मशाली फाऊंडेशन च्या त्या सदस्या आहेत. विविध क्षेत्रात विशेष उपक्रम राबवून त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली असून महिलांनी न घाबरता कोणत्याही क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

Post a Comment

0 Comments