बळी घेतल्यानंतर गडचांदूर न.प.ची मोकाट डुक्कर पकडण्याची मोहिम !




  • 'झोपी गेलेला गडचांदूर न.प. प्रशासन जागा झाला'!
  • स्वच्छता विभागाचे कर्मचारी पकडतील मोकाट डुकरांना !

शामसुंदर बोबडे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा-मागणी !


गडचांदुर : शामसुंदर बोबडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी महोदयांना करण्यात आली आहे. आजच्या स्वच्छता विभागाने केलेल्या कारवाईत 20 मोकाट डूकरांना पकडण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे, परंतु उद्यापासून काय यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्वरित हात-पाय मारायचे व त्यानंतर मात्र जबाबदारी झटकायची अशी भूमिका गडचंदुर नगर परिषद प्रशासनाची नेहमीच राहिली आहे. बोबडे यांच्या मृत्यूचा पूर्वी गडचांदूर मध्ये मोकाट डुकरे फिरत नव्हती कां? मग त्यावर प्रशासन म्हणून न.प. ने किंवा न.प. च्या स्वच्छता विभागाने ही मोहीम हाती कां घेतली नाही? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. एका निष्पाप युवकाच्या मृत्यूला जबाबदार कोण याचे "चिंतन आणि मंथन" समाजसेवक व न.प. प्रशासनाने अवश्य करायला हवे.

चंद्रपूर (प्रति.)
सोमवार दि. १४ डिसेंबर २०२० रोजी गडचांदूर शहरातील सा.बां. विभागाच्या विश्रामगृहासमोर शामसुंदर बोबड़े या दुचाकी स्वारासमोर मोकाट वराह (डुक्कर) आल्यानंतर अपघातात मंगळवार दि. १५ डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथील रूग्णालयात हा युवक मृत पावला. दोन लहानगे मुले व पत्नी असे छोटेसे कुटूंब असलेला शामसुंदर शेतीसोबतचं पानटपरी चा व्यवसाय करायचा. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन व कोविड-१९ च्या शासकीय नियमांचे पालन करीत मार्च महिन्यापासून त्यानी आपली पानटपरी ही बंद ठेवली होती. नुकतीच आपली पानटपरी त्याने उघडली परंतु त्याठिकाणी ही तो फक्त पानांची विक्री करायची. आपल्या घरून शेतात जातांना त्याचेसोबत ही दुर्दैवी घटना घडली, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबाचे काय ? त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासनातर्फे काय कारवाई केल्या जाते, हे बघणे आता गरजेचे आहे.
महत्वाचे म्हणजे काही महिन्यांपूर्वी मोकाट डुकरांचा प्रश्न गडचांदूरात उपस्थित करण्यात होता. सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी कंत्राटी पद्धतीने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी राजुरा येथील कंत्राटादारला कंत्राट देऊ केले होते. तो कंत्राट कुठपर्यंत होता, त्यानंतर मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेला गडचांदूर न. प. चा स्वच्छता विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले, आता एकाचा नाहक बळी गेल्यानंतर पुन्हा गडचांदूर न.प. प्रशासन जागे झाले असून मोकाट जनावरांना पकडून कारवाई करण्याची मोहिम त्यांनी हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मैकाट डुकरामुळे एका निष्पापाचा बळी गेल्यानंतर गडचांदूरातील समाजसेवक तसेचं गडचांदूर शहराच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व अन्य नगरसेवकांसोबत मोकाट डुकरांमुळे नाहक मृत्यू आलेल्या या युवकाच्या मृत्यूला जबाबदार कोण ? यासंदर्भात आम्ही प्रतिक्रिया घेतल्या असता सत्ताधाऱ्यांनी नगर परिषद प्रशासन याला जबाबदार असल्याचे उत्तर दिले तर काहींनी आम्ही याबाबत निवेदने दिली होती. परंतु प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत या मुद्याचे फक्त राजकारण केले असे सांगीतले. एका निष्पाप युवकाचा स्वतःचे कर्तव्य झटकल्यामुळे व बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला, याचे कोणतेही "सोयरसूतक" कूणालाही नसल्याचे जाणवले.

याबाबत बोलतांना विरोधी पक्षाचे भाजपचे नगरसेवक अरूण डोहे यांनी स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे हा गंभीर प्रकार घडल्याचे सांगीतले. महत्वाचे म्हणजे मोकाट वराह (डुक्कर) फिरत असतात, मग ते पकडल्या ही जातात, परंतु नंतर पुन्हा ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर ही येतात. तर पकडले गेलेल्या या मोकाट जनावरांचा काय बंदोबस्त केल्या जात असतो, याची ही चौकशी व्हायला हवी.

मोकाट फिरणारे हे डुक्कर काही मोजक्या लोकांचेचं असतात, त्यातून त्यांचा व्यावसायिक स्वार्थ जुळलेला असतो. त्यांचेवर निर्बंध आणणे गरजेचे आहे, मोकाट फिरणाऱ्या या जनावरांच्या मालकांकडून दंड आकारण्यात आल्यास ही मोकाट जनावरे रस्त्यावर येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ही काही गडचांदूर वासियांनी दिली. तसेच शामसुंदर बोबडे या युवकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ही आता गडचांदूर शहरात जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments