- जुनेचं दारू विक्रेते कामाला लावले असल्याची प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची खाजगी मध्ये कबुली!
- कोविड19 घ्या शासकीय निर्देशांना दारू तस्करांकडून व बेईमान अधिकाऱ्यांकडून तिलांजली !
चंद्रपूर : 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे परंतु या ठिकाणी खुलेआम दारू विक्री होते, यात काही शंका नाही. कोरोना संक्रमणाचा प्रादूर्भाव बघता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु जिल्हाबंदी नंतरही चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर दारूच्या पुरवठा होत आहेत. निर्देशित केलेले नियम जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध त्यानुसार लागू केलेले आहेत सामान्य नागरिक या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असून स्वतःची, शेजाऱ्यांची व कुटुंबाची प्रकृती सुदृढ राहो, कोरोनाचे संकटापासून त्यांना दूर ठेवावे व शासन निर्देशांचे पालन करावे या मध्ये मग्न आहे परंतु चंद्रपुरातील दारूविक्रेत्यानी व त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिस विभागातील काही गद्दारांनी मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये ते परत जिल्ह्यातून आणू दारू पुरवठा करण्याची शपथ घेतली आहे की काय या पद्धतीने मी व्यवसाय सुरू केला आहे. ज्यांचे वर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत व ज्यांची दारू विक्रेते म्हणून पोलीस विभागात नोंद आहे अशा काही ही दारू विक्रेत्यांना सोबत घेऊन चंद्रपुरात दारूचा पुरवठा सुरू केला आहे. समाजाला कलंकित करणारे व आणीबाणीच्या स्थितीमध्ये, जीवावर उदार झालेल्या नागरिकांना वेठीस धरणारे पैशाला सगळे काही समजत आहे जिल्ह्यातील दारू विक्रेते त्यांची सोबत करणारे निर्लज्ज व बेईमान पोलीस अधिकारी यांच्या संगनमताने चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेला देशी विदेशी दारू च्या है व्यवसाय ही आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला लागलेली एक कीड आहे. यावर प्रशासनाने त्वरित निर्बंध आणावा, मास न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदारांकडून शासन पाचशे रुपये दंड करतो आता परजिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये दारूचा पुरवठा होत आहे यावर किंवा यातून रुग्णांची संख्या व त्याचे कुटुंब उध्वस्त होत नाही कां याचा विचार प्रशासनाने अवश्य करायला हवा.
*महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लाॅकडाऊन केल्यानंतरही मागील तीन दिवसापासून दारूबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये नियमितरित्या दारूचा पुरवठा होत आहे. संबंधित अधिकारी वर्ग या ठिकाणी "कुठे मुंग गिळून बसला आहे.* ते कळायला काही मार्ग नाही. सर्वसामान्यांना घरात बसा व निर्देशांचे पालन करा असे सांगणारी शासकीय यंत्रणा चुकीच्या मार्गाने होत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्यासाठी कां बरे निष्क्रिय होत आहे? याची चाचपणी लोकप्रतिनिधींनी अवश्य करायला हवी.*
नुकतेच दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी 30 लाखांच्या जवळपास मुद्देमालासह दारू साठा पकडला. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करताय येईल असे निर्बंध असताना चंद्रपूर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून येणारी दारू व त्याची विक्रेते हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वीची मोहल्ला कमिटी तीन दिवसापासून सक्रिय झाले असून जिल्ह्यात दारू चा पुरवठा सूरू आहे.
त्या "विशाल" चा दारू साठा चंद्रपूरात दाखल ?
"विशाल" नावाचा दारू विक्रेता सध्या चंद्रपूरात सक्रिय झालेला असल्याची अधिकृत माहिती आहे. हा विशाल दोन वर्षापासून दारूच्या व्यवसायात सक्रीय असून जिल्ह्यातील एका नेत्याचा याला "वरदहस्त" असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी "विशाल" ला जेरबंद करण्यासाठी कंबर कसून आहेत, परंतु जिल्ह्यातील नेत्याच्या आशिर्वादामुळे तुरी देत असला तरी "विशाल" चे आज ना उद्या कंबरडे तुटतील यात शंका नाही. एकीकडे "घरातच रहा व स्वस्थ रहा" असा संदेश दिला जात आहे तर दुसरीकडे हा विशाल या सगळ्या नियमांना धाब्यावर ठेवून शहरात "दारू" चा साठा जमा करण्यात मग्न असून नुकताच दारू साठ्याचा मोठा "जखिरा" शहरात आल्याची चर्चा सूरु आहे.
- "त्या दारू विक्रेत्या मोहल्ला" कमेट्या
- आत्ता सॅनिटायझर व मॉस्क चे वितरण करीत आहेत काय?
दारूबंदी नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने दारू विक्री करणारे मोठे व्यापारी मोडला कमिट्या काळामध्ये काय करीत आहेत. या संदर्भात एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याला विचारणा केली असता "ते सध्या सॅनिटायझर व मॉस्क चे वितरण करित आहेत." असे उपहासात्मक उत्तर देत त्यांचे काम पुर्ववत सूरू असून प्रमाण कमी झाले आहे. "आम्ही स्वतःचा जिव जोखीम मध्ये टाकून नागरिकांची सूरक्षा करित आहोत आणि काही कलंकीत स्वयंभु पुढारी व काही अधिकारी-कर्मचारी यांना हाताशी धरून "विशाल" सारख्या दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय माणूसकीला काळीमा फासत सुरू ठेवला आहे, गवसले तर वाट लावूचं !" अशी मिळालेली उग्र प्रतिक्रीया दारू विक्री संबंधातील बोलकी स्थिती सांगणारी आहे. या स्थितीवर जिल्ह्यातील नेत्यांनी व वरिष्ठ प्रामाणिक अधिकाऱ्यांनी अवश्य लक्ष केंद्रित करायला हवे.
0 Comments