अॅड. चंद्रकांत ल. देशमुख यांचेहृदयविकाराने निधन !#advdeshmukh




चंद्रपूर: रविवार दि.13-6-2001 रोजी चंद्रपूरचे ज्येष्ठ विधीज्ञ, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॅड. चंद्रकांत देशमुख यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे निधन झाले. अनेक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायदा अस्तित्वात येण्या अगोदर प्राधिकरणाचे सचिव म्हणून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांकरिता, वंचित, शोषित व दुर्बल घटकांकरिता त्यांनी केलेले निरपेक्ष व निस्पृह काम, चंद्रपूर जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली अनेक अविस्मरणीय कामे, एक निष्णात दिवाणी व फौजदारी अधिवक्ता म्हणून त्यांचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहेत. गोंडवनातील विधी वैभव घ्या लिखाणातून त्यांनी एक लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली.

अॅड चंद्रकांत देशमुख यांच्या निधनाने संवेदनशील , हळव्या मनाचा समाजसेवक हरपला: आ. सुधीर मुनगंटीवार !


चंद्रपूरातील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड चंद्रकांत देशमुख यांच्या निधनाने संवेदनशील , हळव्या मनाचा समाजसेवक हरपल्याची शोकभावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
ऍड चंद्रकांत देशमुख यांनी दीर्घकाळ वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा केली. लोकाग्रणी बळवन्तराव देशमुख स्मृती प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. चंद्रपूरच्या लौकिकात मानाचा तुरा खोवणाऱ्या महनीय व्यक्तींना चंद्रपूर भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केली. त्यांच्या निधनाने चंद्रपूरच्या सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना लाभो व त्यांच्या पुण्यातम्याला शांती प्रदान करो , असेही आ. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments