गडचांदूरातील विकासकामांना भ्रष्टाचाराची "किड"?



  • न.प. मध्ये सिव्हील अभियंता असतांना ही मेकॅनिकल इंजिनिअर कडे कामाची 'अर्थ'पूर्ण देखभाल!

  • तक्रारी देऊन ही कारवाई शुन्य, कामात अपारदर्शकता असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप !

...अन्यथा काम बंद पाडू, मुख्याधिकार्‍यांनी नियमाप्रमाणे काम करणे शिकावे-भाजप नगरसेवक

नगर परीषद अंतर्गत ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीचे काम विना इंजिनिअर ने चालु असल्यास काम बंद पाडु मी नगरसेवक असताना मला पीएमसी ची प्रत घेण्यास आम नागरीका प्रमाणे RTI द्वारे मीळतील म्हणणाऱ्या सिओ नी नियमाप्रमाणे काम करणे शिकावे. सिव्हिल इंजिनिअर च्या उपस्थीतीत काम होत नसेल तर काम बंद पाडु. असा इशारा भाजपचे नगरसेवकांनी दिला आहे.
गडचांदूर शहराच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी या लोकप्रतिनिधींना उद्धटपणाने वागणूक देतात. असा अनुभव अनेक नगरसेवकांना यापूर्वी आलेला आहे. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत जनतेचे कार्य करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचा विसर मुख्याधिकार्‍यांना नेहमी पडत असतो त्याचे अनेक उदाहरण गडचांदूर मध्ये नगरसेवकांनी बघितले आहे. एखाद्या नगरसेवकाला न.प. मधील कागद बघण्यासाठी माहिती अधिकारात मागा असे म्हणणे कितपत योग्य आहे? याचा विचार व्हायला हवा.


गडचांदूर (वि.प्रति.)
सध्या गडचांदूर शहरामध्ये न.प. च्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. यामध्ये ओपनस्पेस सौंदर्गीकरण, नाली बांधकाम आदि कामांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परंतु गडचांदूर शहरात होणारी ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप न.प. तील विरोधी पक्ष असलेल्या भाजप नगरसेवकांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे गडचांदूर शहरातील ओपनस्पेसमध्ये होणाऱ्या सौंदर्यीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी नुकतीच गडचांदूर येथील भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी केली असता या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात गडचांदूर चे सिओ यांचेकडे सदर तक्रार केली असून अद्यापपावेतो त्यांची कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्यामुळे गडचांदूर च्या विकासकामांना भ्रष्टाचारची 'किनार असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.

मेकॅनिकल अभियंता स्वप्निल पिदूरकर
मुख्य भुमिकेत !

७ वर्षापुर्वी न.प. मध्ये रूपांतरित झालेल्या गडचांदूर न.प. मध्ये सिव्हील अभियंता हे पद असून या पदावर अनुप भगत नावाचे अभियंता कार्यरत आहे. परंतु मेकेनिकल इंजिनिअर असलेले स्वप्निल पिदूरकर यांचेकडे सिव्हील कामांची देखरेख देण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. "त्रास हृदयाचा आणि अस्थिरोग तज्ज्ञांकडे उपचार" अशी स्थिती गडचांदूर न.प. ची आहे. एखाद्या कामाच्या देखभालीची (पिएमसी) जबाबदारी कुणाकडे देण्यात येत असल्यास त्याला सभागृहाची मंजुरी आवश्यक असते, अशी मंजुरी घेण्यात आली नसून कोणत्या अधिकाराने व कुणी स्वप्निल पिदूरकर यांचेकडे ही जबाबदारी दिली, याची माहिती जाहिर करण्यात यावी, वारंवार तक्रारी करून ही मुख्याधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत, याचाच अर्थ यामागे मोठी आर्थिक गोम असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. स्वप्निल पिदूरकर वर न.प. प्रशासनाची एवढी कृपादृष्टी का बरे आहे ? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी केली आहे. गडचांदूर शहराच्या विकासात आडकाठी आणण्याचा आमचा प्रयत्न नसून काम मजबुत, टिकाऊ व मंजुरीप्रमाणे ब्हावे या भावनेतुनचं आमचे कार्य आम्ही बजावित असल्याचे मत ही डोहे यांनी यावेळी मांडले.

"त्या त्रिकुटाची लुटारू गोल्डन गैंग !
गडचांदूर शहरात होणाऱ्या कंत्राटी कामामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचे बोलल्या जाते. गडचांदूरातील '"ते" त्रिकुट या कामामध्ये सक्रिय असून गडचांदूर सोबतचं गोंडपिपरी, कोरपना, जिवती या ठिकाणचा सुद्धा या त्रिकुटाकडे कारभार आहे. त्याठिकाणाहुन सुद्धा सिव्हील कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांना करण्यात आलेल्या असल्याची माहिती आहे. याठिकाणी कार्य करणारे हे कठड्यातीलचं कंत्राटदार असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात आल्यास गोल्डन गैंग चा पर्दाफाश होवून मोठा भ्रष्टाचार उघडकीस येवू शकतो.

स्वप्निल पिदूरकर ला राजकीय वरदहस्त?
गडचांदूर न.प. मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले स्वप्निल पिदूरकर यांचेवर जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे "आपले कुणीही काही बिघडू शकत नाही?" अशी खाजगीमध्ये पिदूरकर स्वतः सांगत फिरतात. त्यामुळेचं शासकीय पगार व शासकीय कंत्राट आपलेचं असे पिदूरकर गृहीत धरतात की काय ? अशी चर्चा ही आता सुरू आहे.

Post a Comment

0 Comments