आज 16 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थी अद्यापही संभ्रमात आहेत बोर्डाची परीक्षा दिली आहे, मग बोर्डाचा रिजल्ट बघायच्या कसा या संभ्रमात दहावीतील विद्यार्थी व त्यांचे पालक वाट बघत आहे. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार परंतु वृत्त लिहीस्तोवर विद्यार्थ्यांना कोणत्या रोल नंबर वरून निकाल बघायचे आहे. याची कल्पना नाही. म्हणजे शाळांमध्ये हा रोल नंबर उद्या पाहतो आलेला नाही. शिक्षणाच्या खेळखंडोबा झालेला असल्याचे चित्र आहे. बोर्डाची परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिलीच नाही, मग निकाल बोर्ड जाहीर करेल की शाळा जाहीर करेल हा यक्षप्रश्न आज उभा राहत आहे. विद्यार्थ्यांना आम्ही पास होऊ याची 100% शास्वती आहे जर बोर्डाची परीक्षा दिलीच नाही तर बोर्ड निकाल कसा देत आहे हा महत्त्वाचा प्रश्न? बोर्डाने परीक्षा फी विद्यार्थ्यांकडून घेतली आहे मग आज येणारा निकाल हा कशा पद्धतीने देण्यात येईल हा महत्त्वाचे प्रश्न आहे.
0 टिप्पण्या