गडचांदूर नगरपरिषदेच्या अडेल कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !



गडचांदुर
  • गडचांदूर नगरपरिषदेच्या अडेल कारभाराने शहरातील शैक्षणिक विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

नुकतेच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली नवीन प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना स्थानिक नगर परिषदेकडून कर निर्धारण ,नमुना ८ अ यासारख्या विविध दाखल्यांचे आवश्यकता आहे मात्र दाखले देण्यासाठी चालू वर्षाचा कर भरल्या शिवाय कोणतेही दाखले देणार नाही अश्या गडचांदूर नगरपरिषदेचा अडेल तट्टू कारभाराने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मुलीच्या शैक्षणिक कामासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी गडचांदूर नगरपरिषदेचा कर निर्धारण नमुना आठ अ मिळण्यासाठी दिनांक 2 जुलै रोजी मारोती चापले यांनी अर्ज केला. चार दिवसांनी कर निर्धारण सत्यप्रत काढले मात्र सत्यप्रत सही करण्यासाठी नगर परिषद येथील अजिंक्य वानमोरे या अधिकाऱ्यांनी चालू वर्षाचा कर भरल्याशिवाय सत्यप्रत मिळणार नाही असे उत्तर अर्जदाराला दिले असून अशा अडेल तट्टू धोरणाने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे

मार्च पर्यंतचे कर भरलेले !

सदर अर्जदाराचे मतलामत्तेचे कर मार्च महिन्यापर्यंत भरलेले असून चालू आर्थिक अर्ध वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच चालू वर्षांचा कर दिल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाही असे नियम नागरीकांवर लादले आहे.

चालू आर्थिक वर्षाचा अर्धा तरी कर भरल्या शिवाय कर कर निर्धारण ,नमुना ८ मिळणार नाही

-अजिंक्य वनमोरे
कारनिर्धारन अधिकारी नगर परिषद गडचांदूर

Post a Comment

0 Comments