सफेलकरच्या श्रीराम सेना या संघटनेची मान्यता रद्द!

रणजीत सफेलकरला धर्मादाय आयुक्तांचा दणका!

नागपूर : नागपूर पोलिसांच्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी रणजीत सफेलकर याच्या श्रीराम सेना या संघटनेची मान्यता रद्द केली आहे. याबाबत नागपूर पोलिसांनी माहिती दिली आहे.

श्रीराम सेनेच्या नावाने कुणी धमकावित असेल तर तक्रार करण्याचे नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांचे आवाहन !

रंजीत साफेलकर नावाच्या व्यक्तीने श्रीराम सेना नावाची सेना स्थापन केली होती आणि यात हजारो लोक 980 सभासद रेकाॅर्डवर होते आणि यातले जास्तीत जास्त सभासद गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते त्या सगळ्या लोकांना आणून समज दिलेली असून सामाजिक संघटनेची काही उद्दिष्टे असतात त्या उद्दिष्टानुसार काम श्रीराम सेनेचे नव्हते. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी अशा प्रकारचा संघटनेचा वापर होत होता आणि इतर गुन्हे आहेत याबाबतची माहिती धर्मादाय आयुक्त आणि सामिल सदस्यांना दिली होती, त्यानुसार आयुक्तांनी श्रीराम सेनेचे संघटनेची मान्यता रद्द केली आहे. श्रीराम सेनेच्या नावाखाली धमकावित असेल तर त्याबाबतची तक्रार पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहन नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी केले आहे.

एकनाथ निमगडे व मनीष श्रीवास हत्याकांड रणजीत सफेलकर याने घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीवास हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी सफेलकर व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. सफेलकर टोळी विरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. त्यानंतर सफेलकर याच्याविरुद्ध खून, खंडणी, अग्निशस्त्र बाळगणे आदींसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सफेलकर याच्या संघटनेची मान्यता रद्द करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविले होते. सोबत सफेलकर याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहितीही जोडली. त्याआधारावर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्तांनी रणजीत सफेलकरच्या संघटनेची मान्यता रद्द असून तशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, २८ एप्रिल रोजी राजमाने यांच्या नेतृत्वात कामठी नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सफेलकर याचे राजमहाल नावाचे लॉन व सभागृह भुईसपाट केले आहे. सफेलकर हा तीन संस्थांमार्फत संचालित सात शाळांचा अध्यक्षही होता.

श्रीराम सेनेच्या नावाने कुणी धमकावित असेल तर तक्रार करण्याचे नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांचे आवाहन !

रंजीत साफेलकर नावाच्या व्यक्तीने श्रीराम सेना नावाची सेना स्थापन केली होती आणि यात हजारो लोक 980 सभासद रेकाॅर्डवर होते आणि यातले जास्तीत जास्त सभासद गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते त्या सगळ्या लोकांना आणून समज दिलेली असून सामाजिक संघटनेची काही उद्दिष्टे असतात त्या उद्दिष्टानुसार काम श्रीराम सेनेचे नव्हते. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी अशा प्रकारचा संघटनेचा वापर होत होता आणि इतर गुन्हे आहेत याबाबतची माहिती धर्मादाय आयुक्त आणि सामिल सदस्यांना दिली होती, त्यानुसार आयुक्तांनी श्रीराम सेनेचे संघटनेची मान्यता रद्द केली आहे. श्रीराम सेनेच्या नावाखाली धमकावित असेल तर त्याबाबतची तक्रार पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहन नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments