गडचांदूर पो.स्टे. मध्येचं पोलीसानेचं चाकुने केला भावावर वार !  • पोलिस स्टेशन डायरी मधून नेहमीप्रमाणे माहिती "साहेबांना"च विचारण्याची जोडली पुष्टी!

  • कौटुंबिक पवादातून घडले प्रकरण!

  • पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्वतः या प्रकरणाचा करावा तपास !

पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्वतः या प्रकरणाचा करावा तपास !गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये आज घडलेलले प्रकरण हे गंभीर आहे. पोलीस असलेल्या लहान भावाने पोलीस असलेल्या मोठ्या भावावर चक्क पोलीस स्टेशन मध्ये चाकूने हल्ला करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. नोकरी वाचविण्यासाठी दुखापतीचे स्वरूप कमी दाखवावे यासाठीही प्रयत्न करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतः पोलीस अधीक्षकांनी त्वरित करावी, अशी या निमित्ताने मागणी होत आहे.

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर पो.स्टे. मध्येचं आज शनिवार दि. ११ रोजी करण नावाच्या एका पोलिसांने चक्क पोलिस स्टेशनमध्येच आपल्या सख्ख्या भावावर चाकूने वार केला. मिळालेल्या माहितीनुसार करण हा गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे. त्यांचा मोठा भाऊ एका कौटुंबिक वादासंदर्भात त्याची समजूत काढण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेला असता "करण" नावाच्या पोलिसांनी आपल्या सख्ख्या भावावर चाकूने दोन वार केले. या घटनेमध्ये त्याच्या मोठा भाऊ याला गंभीर दुखापत झाली. कायदेशीर कारवाई करीत मोठ्या भावाला गडचांदूर पोलिसांनी "मेडीकल" साठी गडचांदूर च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. गुन्हा झाला तेव्हाच गडचांदूर पोलिसांनी "मेडीकल"साठी पाठविले मग ही माहिती स्टेशन डायरी वरून पत्रकारांसोबत लपविण्याचे कारण काय? मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या या प्रकरणामधील मोठा भाऊ हा सुद्धा जिल्ह्यातीलच एका पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस वाल्या लहान भावाने चक्क पोलीस वाल्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला करणे ही बाब गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिस असलेला लहान भाऊ करण हा चक्क चाकू घेऊनच ठाण्यात प्रवेश केला होता. त्याने आपल्या मोठ्या भावावर बार केले. पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या या प्रकरणाची तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतरच पोलीस स्टेशन मधूनचं गडचांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात मेडिकलसाठी पाठविण्यात आले.

"स्टेशन डायरी मधून "साहेबांना" विचारा, हे ठरलेले उत्तर !

गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या कोणत्याही घटनेची माहिती स्टेशनचा डायरीवर विचारल्यास साहेबांना विचारा हे बिलकुल रटलेले उत्तर आहे. स्टेशन डायरी वर एखादा गुन्हा नोंद झाला असल्यास त्याची माहिती पत्रकारांना कां बरे दिली जात नाही याचे उत्तर बहुतेक गडचांदूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गोपाल भारती हेच देऊ शकतात. गडचांदूर पोलिसांना त्यांनी तशाच सूचना ठाणेदारांकडून देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments